क्रिकेटच्या मैदानावर अनेक किस्से घडतात. काही वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंमध्ये वाद होतात, पण त्याच्या आठवणी कायम राहतात. पुढे जाऊन या गोष्टींसाठी खेळाडू माफीही मागतात. असेच काहीसे दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ऍलन डोनाल्ड यांनी केले आहे. त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे. डोनाल्ड हे बांगलादेश संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. यामागील हैराण करणारे कारण समोर आले आहे.
ऍलन डोनाल्ड (Allan Donald) यांनी 1997 दरम्यानच्या एका सामन्यादरम्यान राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना स्लेज केले होते. त्यासाठी आता ऍलन डोनाल्ड यांनी राहुल द्रविड यांची माफी मागितली.
‘मी राहुल द्रविड यांना जे काही म्हटले, त्यासाठी माफी मागतो’
आता राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून बांगलादेश दौऱ्यावर आहेत. तसेच, ऍलन डोनाल्ड हेदेखील यावेळी बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांनी 25 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेसाठी राहुल द्रविड यांची माफी मागितली आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “डर्बनमध्ये एक किस्सा घडला होता, ज्याबद्दल मला बोलायचे नाहीये. द्रविड आणि सचिन हे आमच्याविरुद्ध खूप धावा करत होते. मी त्यावेळी द्रविडला काहीतरी म्हटले होते. मात्र, मी त्यांचा सन्मान करतो. मी राहुल द्रविड यांची पुन्हा एकदा माफी मागू इच्छितो. मला त्यांची विकेट घेण्यासाठी काही ना काही करायचे होते. मात्र, त्यादिवशी मी त्यांना जे काही म्हटले, त्यासाठी आताही माफी मागतो. त्यामुळे राहुल द्रविड जर तुम्ही ऐकत असाल, तर मला तुमच्यासोबत डिनरला जायला आवडेल.”
खरं तर, 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात डर्बन येथे एक वनडे सामना खेळला गेला होता. त्यादरम्यान ऍलन डोनाल्ड यांनी राहुल द्रविड यांना स्लेज करत अवमानजनक भाषेचा वापर केला होता. द्रविड यांनी त्या सामन्यात सर्वाधिक 84 धावा केल्या होत्या. तसेच, डोनाल्ड यांनीही त्यांच्या संघाकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्या सामन्यात राहुल द्रविड यांना बाद करण्यासाठी त्यांनी स्लेजिंग केली होती, पण भारतीय संघानेच त्या सामन्यात विजय मिळवला होता. (bangladesh coach allan donald issues public apology to rahul dravid for old ugly behaviour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि स्लेजिंग म्हणजे जुणं नातं! सिराजने लिटन दासला बाद करतानाच केले ‘हे’ कृत्य
प्लेसिसने उकरून काढले बॉल टेम्परिंग प्रकरण! स्मिथवर लावले गंभीर आरोप