---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 4:25 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघ संध्या बांग्लादेश दौऱ्यावर असून दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. या मालिकेत पाहुण्या वेस्ट इंडिजला क्लिन स्विप करत बांग्लादेशने मालिका खिशात घातली. यानंतर ३ फेब्रुवारीपासून दोन्ही संघ २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यासाठी शनिवारी (३० जानेवारी) बांग्लादेश क्रिकेटने १८ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात २ नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

बांग्लादेश क्रिकेटने जाहीर केलेल्या कसोटी संघात हसन महमूद आणि यासिर अली चौधरी या अनकॅप खेळाडूंची निवड झाली आहे. वेगवान गोलंदाज हसन महमूद याने यापुर्वी बांग्लादेशच्या वनडे आणि टी२० संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. मात्र फलंदाज यासिर अली याची पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात जागा मिळाली आहे.

याव्यतिरिक्त अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा दुखापतीतून सावरल्याने त्यालाही १८ सदस्यीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना त्याला ग्रोइनची दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर पडला होता.

वनडे मालिकेत बांग्लादेशची अप्रतिम कामगिरी

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांग्लादेशने उत्तम कामगिरी करत वेस्ट इंडियचा व्हाईटवॉश केला होता. ढाका येथे झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात त्यांनी अनुक्रमे ७ आणि ६ विकेट्सने विजयी पताका झळकावली होती. तर अखेरच्या सामन्यातही १२० च्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता.

यानंतर २९ जानेवारीपासून दोन्ही संघ सराव सामना खेळत आहेत. ३१ जानेवारी रोजी हा सामना संपेल. पुढे ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान चट्टोग्राम येथे पहिल्या कसोटी सामन्याची लढत होईल. मग ढाका येथील अखेरच्या कसोटी सामन्याने मालिकेसह दौऱ्याची समाप्ती होईल.

वनडे मालिकेतील एकतर्फा विजयाप्रमाणे कसोटीतही विजयी घोडदौड कायम करण्यासाठी बांग्लादेश संघ प्रयत्नात असेल. तर वेस्ट इंडिजचा संघ पराभवाचा वचपा काढत गोड शेवट करण्यासाठी झगडताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

Ind vs Eng : स्टोक्स-आर्चरने केला सरावाला प्रारंभ, उर्वरित सहकारी ‘या’ तारखेपासून होणार सहभागी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचा अजिंक्य रहाणेला फायदा, कसोटी क्रमवारीत पटकावलं ‘हे’ स्थान

अबब! ३९ वर्षीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानी धडक, पाहा कोणत्या क्रमांकावर आहेत अश्विन- बुमराह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---