---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचा अजिंक्य रहाणेला फायदा, कसोटी क्रमवारीत पटकावलं ‘हे’ स्थान

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 2:55 PM
---Advertisement---

काही दिवसांपुर्वी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघातीत २ सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेत पाहुण्या इंग्लंडने २-० ने यजमान श्रीलंकाचा व्हाईटवॉश केला होता. तर तत्पुर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमित २-१ च्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. यानंतर नुकतीच आयसीसीने जागतिक कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना फायदा झाला आहे.

अनुभवी कसोटीपटू रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामने खेळत तब्बल २६८ धावा केल्या होत्या. यात मेलबर्न कसोटीत विजयी पताका झळकावण्यासाठी त्याने केलेल्या झुंजार शतकाचा समावेश आहे. २२३ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने त्याने ११२ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. या अप्रतिम कामगिरीचे फळ आता त्याला कसोटी क्रमवारीतील प्रगतीच्या रुपात मिळाले आहे. रहाणेने ७४८ धावांची कमाई करत एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आठव्या स्थानावर ताबा मिळवला आहे.

रहाणेबरोबर भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ पुजारा यानेही एका स्थानाने उडी घेतली आहे. तो ७६० गुणांसह सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी आला आहे. पुजारानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत २५० हून अधिक धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३ अर्धशतक ठोकले होते.

याव्यतिरिक्त केन विलियम्सन सर्वाधिक गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. तर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट टॉप-५ मधील आपापल्या स्थानावर विराजमान आहेत.

फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

विशेष म्हणजे, लवकरच इंग्लंड संघाचा भारत दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

अबब! ३९ वर्षीय गोलंदाजाची आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानी धडक, पाहा कोणत्या क्रमांकावर आहेत अश्विन- बुमराह

टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या ‘या’ धाकड फलंदाजाचे होतेय पुनरागमन

“असेच चालू राहिले तर मानसिक दृष्ट्या आजारी होतील विराट, अजिंक्य, रोहितसारखे क्रिकेटर” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---