वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात एँटिगुआ येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेश संघाच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. पहिल्या डावात बांगलादेशचा पूर्ण संघ १०३ धावांवरच गुंडाळला गेला. यादरम्यान त्यांचे ६ फलंदाज खाते न उघडता बाद झाले. या खराब प्रदर्शनासह बांगलादेश संघाने एका लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies vs Bangaldesh) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून फक्त कर्णधार शाकिब अल हसनने अर्धशतक केले. तर सलामीवीर महमुदुल हसन रॉय, नजमुल हुसैन, शान्तो, मोमिनूल हक, यष्टीरक्षक नुरुल हसन, मुस्तफिजूर रेहमान आणि खलील अहमद हे शून्य धावेवर बाद झाले.
क्रिकेटविश्वात ही सातवी वेळ आहे, जेव्हा कोणत्या संघाचे ६ फलंदाज एका डावात शून्यावर (Six Batsman On Duck) बाद झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, या यादीत बांगलादेश संघाने चक्क तिसऱ्यांदा त्यांच्या नावाची नोंद केली आहे. तर चालू वर्षात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एका डावात बांगलादेशचे ६ फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले आहेत. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील एका सामन्यातही बांगलादेशच्या फलंदाजांनी असे निराशाजनक प्रदर्शन केले होते.
१९८० साली सर्वात प्रथम पाकिस्तान संघाने या नकोशा यादीत त्यांच्या नावाची नोंद केली होती. पाकिस्तान आणि बांगलादेशव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, भारत आणि न्यूझीलंड संघांची नावेही या यादीत सहभागी आहेत.
एका कसोटी डावात संघाचे ६ फलंदाज शून्यावर बाद-
पाकिस्तान १९८०, वि. वेस्ट इंडिज
दक्षिण आफ्रिका १९९६, वि. भारत
बांगलादेश २००२/०३, वि. वेस्ट इंडिज
भारत २०१४, वि. इंग्लंड
न्यूझीलंड २०१८, वि. पाकिस्तान
बांगलादेश २०२२, वि. श्रीलंका
बांगलादेश २०२२, वि. वेस्ट इंडिज*
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना ३२.५ षटकातच १०३ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या दिवसाखेर ४८ षटके खेळताना २ विकेट्सच्या नुकसानावर ९५ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (४२ धावा) व एनक्रुमाह बोनर (१२ धावा) फलंदाजी करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू दमदार शकतो पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण