इंग्लंड संघाचा बांगलादेश दौरा मंगळवारी (14 मार्च) संपला. उभय संघांतील शेवटचा सामना बांगलादेशने 16 धावांच्या अंतराने जिंकला आणि इंग्लंडला क्लीन स्वीप दिला. बांगलादेशविरुद्धची ही टी-20 मालिका इंग्लंड लक्षात ठेऊ इच्छित नसले. कारण मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडचा दारून पराभव झाला. मंगळावीर मिरपूरमध्ये खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात लिटन दार सामनावीर ठरला.
इंग्लंडे या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. पण तरीदेखील बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. सलामीवीर लिटन दास (Litton Das) याने संघाला चांगली सुरुवात मळवून दिली. रॉनी तालुकदार (Rony Talukdar) यांने 24 धावांवर विकेट गमावली असली, तरी नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याने 47 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. नाजमूलच्या साथीने कर्णधार शाकिब अल हसन 4 धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशिद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात इंग्लंडपुढे बांगलादेशने विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडसाठी डेविड मलान आणि फिल साल्ट डावाची सुरुवात करण्यासाठी आले. डेविड मलानने 53 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली. पण फिल साल्ट एकही धाव न करता तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जोस बटलर 40 धावा करून बाद झाला. बटलर आणि मलानव्यतिरिक्त इंग्लंडचा एकही फलंदाज 20 धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजी आक्रमणातील तस्किन अहमद याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मुस्तफिझूर रहमान, शाकिब अल हसन आणि तनवीर इस्लाम याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दरम्यान, उभय संघांतील या टी-20 मालिकेची एकंदरीच विचार केला, तरत बांगलादेशने पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने, तर तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या टी-20 मालिकेत क्लीव स्वीप स्वाकरण्यापूर्वी वनडे मालिका मात्र नावावर केली होती. वनडे मालिकेतील दोन सामने पाहुण्या इंग्लंडने जिंकले होते, तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता.
(Bangladesh gave a clean sweep to England in the ODI series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दे घुमा के! 6,6,6…कतारमध्ये घोंगावलं ख्रिस गेल नावाचं वादळ, उभ्या-उभ्याच षटकारांची केली बरसात
मावळ तालुक्यात क्रिकेटच्या मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी – व्हिडिओ