कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेचा 31वा सामना मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) रंगणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात रंगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाकिस्तान संघात तीन बदल झाले आहेत. इमाम उल हक, शादाब खान आणि मोहम्मद नवाज संघाबाहेर झाले आहेत. त्यांच्या जागी फखर जमान, आगा सलमान आणि उसामा मीर संघात परतले आहेत.
स्पर्धेत कोण चांगल्या स्थितीत?
पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) संघांची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर पाकिस्तान बांगलादेशपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते. कारण, पाकिस्तानने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यातील 2 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघाने 6 सामने खेळताना 5 सामने गमावले आहेत. तसेच, त्यांना फक्त 1 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. अशात हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
पाकिस्तान संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट -0.387 आहे, तर बांगलादेश संघ नवव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट -1.338 इतका आहे. अशात या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. (Bangladesh have won the toss and have opted to bat against pakistan)
विश्वचषकातील 31व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हॅरिस रौफ
अफगाणिस्तान
लिटन दास, तंजीद हसन, नजमूल होसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, तौहिद ह्रदोय, मेहिदी हसन मिराझ, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम
हेही वाचा-
इंग्लंडच्या पराभवानंतर चिडले रवी शास्त्री; म्हणाले, ‘तुम्ही स्वत:ला वर्ल्ड चॅम्पियन म्हणवता? आता…’
सामना गमावताच श्रीलंकेच्या नावावर विश्वचषकातील सर्वात खराब Recordची नोंद; टीम इंडियाही म्हणेल, ‘नको रे बाबा!’