fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

इंदोर। आजपासून(14 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे सुरु झाला आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात इशांत शर्माला संधी मिळाली आहे. त्याला शहाबाज नदीम ऐवजी आज 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

या एका बदला व्यतिरिक्त या मालिकेआधी मागील महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेला 11 जणांचा भारतीय संघच आजपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्यासाठी कायम करण्यात आलेला आहे.

त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठीही यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बाहेर बसावे लागले असून यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाला 11 जणांच्या संघात जागा मिळाली आहे.

याबरोबरच गोलंदाजांच्या फळीत इंशातशिवाय मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज आहेत. तर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

बांगलादेशने त्यांच्या 11 जणांच्या संघात 7 फलंदाज आणि 4 गोलंदाज असे संमिश्रण ठेवले आहे. त्याचबरोबर या कसोटी मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व मोमिनुल हक करत आहे. बांगलादेशचा कसोटी कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

बांगलादेश – इम्रुल काइस, शाद्मन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन, तैझुल इस्लाम, अबू जैद, एबादत हुसेन

You might also like