---Advertisement---

SL vs BAN Toss: सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात ‘हा’ संघ ‘टॉस का बॉस’, एक बदलासह बांगलादेश उतरणार मैदानात

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 2:47 PM
SL-vs-BAN
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक बांगलादेश संघाने जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात श्रीलंका संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार आहे. तसेच, बांगलादेश संघ एका बदलासह मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी बांगलादेश संघात अफिफ होसेन याच्या जागी नसूम अहमद याला घेतले आहे.

श्रीलंकेने जिंकलेत सलग 12 सामने
श्रीलंका संघाकडे या सामन्यात मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. श्रीलंका संघाने खेळलेल्या मागील सलग 12 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे हा विजयरथ सुरू ठेवण्याची सुवर्णसंधी आहे. श्रीलंकेने या विजयरथातील पहिला सामना 4 जून, 2023 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर अखेरचा सामनाही 5 सप्टेंबर, 2023 रोजी अफगाणिस्तानविरुद्धच 2 धावांनी जिंकला होता. अशात या सामन्यात श्रीलंका काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सुपर-4मधील दुसऱ्या सामन्यासाठी उभय संघ-
बांगलादेश-

मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराज, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद, नसुम अहमद

श्रीलंका-
पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महीश थीक्षणा, कसुन राजिथा, मथीशा पथिराना (Bangladesh have won the toss and have opted to field Asia Cup 2023)

हेही वाचाच-
मोठी बातमी! भारताच्या आणखी एका खेळाडूने धरली परदेशी संघाची वाट, वाचा कोण आहे तो?
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---