महाराष्ट्रातील बीड जिल्हात जन्म झालेला व भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाजी कोच संजय बापुसाहेब बांगरने बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मोठी ऑफर नाकारली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाच्या कसोटी संघाचे सल्लागार होण्याची मोठी ऑफर बांगर यांना होती. ८ आठवड्यांपुर्वी बांगर यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने फलंदाजी प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली होती.
यापाठीमागील मोठे कारण अर्थातच बांगर यांनी स्टार स्पोर्ट्स बरोबर दोन वर्षांसाठी करार केला आहे.
“सध्या मी स्टार स्पोर्ट्सबरोबर करारबद्ध आहे. त्यामुळे मला हे संतुलन राखण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाबरोबर करार करता येणार नाही. परंतु भविष्यात मी बांगलादेश संघाबरोबर काम करण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. ” असे यावेळी बांगर म्हणाले.
सध्या नील मॅकेंझी हे बांगलादेशच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.
बांगर हे २०१४ ते २०१९ या काळात भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. सध्या त्यांच्या जागी विक्रम राठोड काम करत आहेत. विश्वचषकानंतर झालेला वेस्ट इंडिज दौरा ही बांगर यांची टीम इंडियाबरोबरची शेवटची मालिका होती.
सध्या बांगर समालोचनात व्यस्त आहेत. भारताकडून ते २००१ ते २००४ या काळात १२ कसोटी व १५ वनडे सामने खेळले आहेत.
ट्रेडिंग घडामोडी-
– विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी
–…आणि त्या षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!
-…तर धोनीने नक्कीच टीम इंडियात कमबॅक करायला पाहिजे!
-कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणाऱ्या खेळाडूचा आज आहे वाढदिवस