---Advertisement---

बांगलादेश आता ठाम भूमिकेत; आयसीसीला दिले मोठे आव्हान!

On: मंगळवार, जानेवारी 20, 2026 7:37 PM
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आपल्या आडमुठ्या स्वभावापासून मागे हटायला तयार नाही. आयसीसीने (ICC) दिलेल्या अल्टीमेटमवर आता त्यांनी उलट आयसीसीलाच सुनावण्यास सुरुवात केली आहे. बीसीबीचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आयसीसीला इशारा दिला आहे की, ते बोर्डाच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाहीत. 21 जानेवारीच्या मुदतीपूर्वी बांगलादेशच्या भूमिकेबद्दल विचारले असता नजरुल म्हणाले की, आयसीसीकडून त्यांना स्पर्धेतून संभाव्य बहिष्काराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मंगळवारी एका पत्रकार परिषदेत नजरुल म्हणाले, “आमच्यावर अयोग्य आणि अवास्तव दबाव टाकून आम्हाला भारतात खेळण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. आम्हाला अद्याप अधिकृतपणे कळवण्यात आलेले नाही की बोर्ड आम्हाला स्पर्धेतून बाहेर काढून स्कॉटलंडचा समावेश करेल. जर आयसीसी, बीसीसीआयच्या (BCCI) दबावाखाली येऊन आमच्यावर दबाव टाकत असेल आणि अवास्तव मागण्या ठेवत असेल, तर आम्ही त्या स्वीकारणार नाही. जेव्हा भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, तेव्हा आयसीसीने स्पर्धेचे ठिकाण बदलल्याची उदाहरणे आहेत. आम्ही देखील रास्त कारणांमुळे ठिकाण बदलण्याची विनंती केली आहे. ते अयोग्य आणि अतार्किक दबाव टाकून आम्हाला भारतात खेळण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाहीत.”

हा वाद सुरू झाल्यानंतर आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत, परंतु अद्याप कोणताही ठोस निकाल हाती आलेला नाही. बीसीबीची ताठर भूमिका पाहता, सर्वोच्च संस्थेने (ICC) आता कडक पवित्रा घेतला असून 21 जानेवारीपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय कळवण्यास सांगितले आहे. जर बीसीबीने आपली टीम भारतात पाठवण्यास नकार दिला, तर आयसीसी कदाचित दुसऱ्या संघाची घोषणा करू शकते. सध्याच्या रँकिंगनुसार या शर्यतीत स्कॉटलंडचा संघ सर्वात आघाडीवर आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. तर दुसऱ्या सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा सामना ईडन गार्डन्सवर बांगलादेशशी होणार आहे. कॅरेबियन संघाशी खेळल्यानंतर 9 फेब्रुवारीला याच मैदानावर बांगलादेशची गाठ इटलीशी पडणार आहे. या दोन सामन्यानंतर कोलकातामध्येच त्यांचा सामना इंग्लंडशी होईल. त्यांचा चौथा सामना 17 फेब्रुवारीला वानखेडे स्टेडियमवर नेपाळविरुद्ध आहे, जो साखळी फेरीतील त्यांचा शेवटचा सामना असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---