क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटले जाते. मात्र, सामन्यादरम्यान असे काही किस्से घडतात, ज्याची सर्वत्र चर्चा होते. आता असेच काहीसे झाले आहे. यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने बांगलादेशमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 लीग बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये लाजीरवाणे कृत्य केले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मंगळवारी (दि. 31 जानेवारी) बांगलादेश प्रीमिअर लीग (Bangladesh Premier League) स्पर्धेतील 32वा सामना खुलना टायगर्स विरुद्ध कोमिला व्हिक्टोरियन्स संघात पार पडला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना टायगर्स संघाने तमीम इकबालच्या 95 आणि शाय होप्सच्या 91 धावांच्या जोरावर 210 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज आजम खान (Azam Khan) याने फक्त 4 चेंडू खेळत नाबाद 12 धावांची खेळी साकारली. त्याने यादरम्यान 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. तसेच, संघाची धावसंख्या 200च्या पार नेली. मात्र, जॉनसन चार्ल्स याच्या शतकाच्या जोरावर कोमिला संघाने 18.2 षटकात 3 विकेट्स गमावत हा सामना 7 विकेट्सने खिशात घातला.
नसीमने उडवली थट्टा
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) हा बीपीएल (BPL) स्पर्धेत कोमिला संघाकडून खेळत आहे. त्याने खुलना संघाविरुद्धच्या सामन्यात आजम खान याच्या लठ्ठपणाची थट्टा केली. आधी त्याने गोलंदाजीदरम्यान समोरच्या बाजूने त्याला जोरदार टक्कर मारली. त्यानंतर पाठीमागून घाणेरडे इशारे करत त्याच्या लठ्ठपणावरून त्याला चिडवले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Naseem Shah teasing Azam Khan at the Bangladesh Premier League #BPL2023 #Cricket pic.twitter.com/IsJgBLcE0i
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) January 31, 2023
Cute @iNaseemShah at his best. Being an emotional bowler, still he didn't retaliate. 👏👏😍😍❤️❤️#Naseemshah pic.twitter.com/z9P0Rg9wor
— Muhammad Ishaq (@Muhamma45635970) January 31, 2023
आयसीसी करणार कारवाई?
आयसीसी नियमांचा भंग होऊ नये म्हणून अनेक लीग क्रिकेटवरही लक्ष ठेवते. बीपीएल ही लीग बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अंतर्गत येते. त्यामुळे आयसीसी थेट यावर प्रतिबंध घालू शकत नाही. मात्र, प्रकरण गंभीर झाले, तर आयसीसी यावर योग्य ती कारवाई घेण्यास सांगू शकते. आयसीसी वर्णभेदी वक्तव्याबाबत खूपच कठोर आहे. तसेच, त्यांच्या लेखी बॉडी शेमिंग हेदेखील चुकीचेच आहे. जर शाहीनविरुद्ध तक्रार केली गेली, तर त्याच्या सामना शुल्कामध्ये कपात केली जाऊ शकते किंवा त्याच्यावर एका सामन्याची बंदीही आणली जाऊ शकते. (bangladesh primier league 2023 pacer naseem shah mock azam khan healthy body see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाकडून खळबळजनक विधानांचा मारा; भारतावर लावला ‘विश्वासघाता’चा आरोप?
खेळपट्टी वादामध्ये सूर्याने मांडलं हार्दिकपेक्षा वेगळं मत; म्हणाला, ‘त्याने काही फरक नाही पडत…’