पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांत्यातील दुसरा वनडे सामना कराचीमध्ये खेळला गेला. उभय संघातील पहिला वनडे सामना पाकिस्तानने 6 विकेट्स राखून नावावर केला होता. दुसरा वनडे सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तान संखाडून मैदानात एक मोठी चूक झाली. पंच अलीम दार पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह याच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले. पंचांचा राग शांत करण्यासाठी नसीम शाहला त्यांचे पाय धरण्याची वेळ आली असून चाहते हा मजेशीर प्रसंग पाहून आनंद घेत आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांत्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात मैदानात हा मजेशीर प्रसंग चाहत्यांना पाहायला मिळाला. पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यामुळे या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे याने अप्रतिम खेळी केली. कॉनवेने 92 चेंडूत 101 धावा केल्या असून संघाची धावसंख्या 261 पर्यंत नेली. कॉनवेच्या साथीने केन विलियम्सन याने देखील 85 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या दोघांनी विकेट गमावल्यानंतर मात्र न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना स्वस्तात विकेट्स गमावल्या. 5 विकेट्सच्या नुकसानावर 200 धावा करणारा न्यूझीलंड संघ 261 धावांवर सर्वबाद झाला.
नसीमने पंचांना मारला चेंडू –
न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी मैदानात असे काही घडले, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याने एक थ्रो फेकला, जो मैदानी पंच अलीम डार (Aleem Dar) यांच्या पायावर जाऊन लागला. चेंडू वेगात असल्यामुळ पंचांना होणाऱ्या वेदना देखील जास्त होत्या. अलीम डार चेंडू लागल्यानंतर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Ouch ????????#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/JyuZ0Jwxi5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 11, 2023
व्हिडिओ आपण पाहू शकतो की, नसीम त्याने मारलेला चेंडूं पंचांना लागल्यानंतर धावत त्यांच्या जवळ गेला. नसीमने पंचांचा राग आणि वेदान कमी करण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न केल्याचे चाहत्यांना या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. चेंडू ज्याठिकाणी लागला, त्याठिकाणी नसीन हाताने हळूवार चोळतानाही दिसला. पंचांचा संताप या एका गोष्टीवरून समजू शकतो की, त्यांना चेंडू लागल्यायनंतर हातातील हारिस रउफचा टी-शर्ट खाली फेकून दिला. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यादरम्यान हसताना दिसत आहे. (Umpire Aleem Dar get furious after Naseem Shah hit the ball, watch video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
सरफराज अहमदमुळे थांबला खेळ! लाईव्ह सामन्यात पत्नीला नेहाळत बसला पाकिस्तानी दिग्गज