बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील ही मालिका बांगलादेशमध्ये खेळली जात असून मंगळवारी (28 नोव्हेंबर) मायदेशातील परिस्थितीचा फायदा संघाला मिळाला. दुसरीकडे न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने अप्रतिम गोलंदाजी केली.
बांगलादेश आणि न्यूझीलंड (Bangladesh vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना सिल्हेटमध्ये आयोजित केला गेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशने 9 विकेट्सच्या नुकसानावर 310 धावांपर्यंत मजल मारली. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना पहिल्या दिवशी 300 पेक्षा अधिक धावा करण्याची बांगलादेश संघासाठी ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी बांगलादेशने कधीच 300पेक्षा अधिक धावा केल्या नव्हत्या. सलामीवीर महमुदुल हसन (Mahmudul Hasan) जॉय यांने 166 चेंडूत 86 धावांची खेळी केली. पण संघातील इतर एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.
दुसरीकडे न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याचे योगदान कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी महत्वाचे ठरले. फिलिप्सने 16 षटकांमध्ये 53च्या सरासरीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 3.31 एवढा होता. न्यूझीलंड संघासाठी ग्लेन फिलिप्स सध्या परिपूर्ण अष्टपैलूची भूमिका पार पाडत आहे. फिलिप्सने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. कारकिर्दीतील अवघा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी फिलिप्स मंगळवारी मैदानात उतरला आणि त्याने ही चमकदार कामगिरी केली. कायन जेमिन्सन आणि अजाज पटेल यायंनी प्रत्येकी दोन-दोन घेतल्या. तसेच ईश सोढी यानेही एक विकेट घेतली.
पहिल्या दिवसाखेर तैजुल इस्लाम (8*) आणि शरीफूल इस्लाम (13*) खेळपट्टीवर कायम आहेत. एखाद्या कसोटी सामन्यात ही केवळ दुसरी वेळ आहे, जेव्हा बांगलादेशच्या 10 फलंदाजांनी दोन आकडी धावसंख्या केली असेल. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये न्यूझीलंड डावातील 10 वी विकेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. (Bangladesh scored 310 runs for the loss of 9 wickets against New Zealand on the first day of the Test match)
महत्वाच्या बातम्या –
‘तीही माणसं आहेत, रोबोट नाहीत…’, भारताविरुद्धची T20 मालिका मध्येच सोडणाऱ्या खेळाडूंविषयी कुणी केले भाष्य?
पहिल्या दोन पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय चर्चा झालेली? मुख्य प्रशिक्षकाकडून मोठा खुलासा