नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत वनडे पदार्पण केलेला बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज तन्झीम हसन साकिब हा आता एका मोठ्या वादात सापडलेला दिसत आहे. मागील वर्षी केलेल्या महिलांबाबतच्या एका फेसबुक पोस्टमुळे त्याच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता असून, त्याच्याशी एक मोठा वाद जोडला जाऊ शकतो.
तन्झीम हसन याने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील भारतीय संघाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात वनडे पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला बाद केले. तर, त्यानंतर तिलक वर्मा याचा देखील त्रिफळा उडवला. आपल्या वेगवान गोलंदाजीने तसेच अचूक टप्प्याने त्याने सर्वांना प्रभावित केले. आगामी वनडे विश्वचषकासाठी त्याचा बांगलादेश संघात समावेश केला जाऊ शकतो.
या सर्व पार्श्वभूमीवर त्याची एक जुनी फेसबुक पोस्ट समोर आले आहे. यामध्ये त्यांनी महिलांविरोधात एक आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्याने लिहिले होते,
One of Tanzim Sakib's posts which is under the radar. pic.twitter.com/c58cZtCSLm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 18, 2023
‘बायको नोकरी करणारी असेल तर नवऱ्याचे हक्क सुरक्षित राहत नाहीत, बायको नोकरी करणारी असेल तर मुलांना वेळ देता येत नाही, बायको नोकरी करणारी असेल तर तिच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे होते, बायको नोकरी करणारे असेल तर कुटुंब उध्वस्त होते, बायको नोकरी करणारी असेल तर समाजावर चुकीचा प्रभाव पडतो.’
त्याच्या या पोस्टनंतर आता अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तो एका मोठ्या वादात सापडण्याची शक्यता आहे.
(Bangladesh seamer Tanzim Hasan Sakib has become the talk of the town over his misogynistic social media posts that criticized working women)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज