---Advertisement---

मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास

Rohit Sharma
---Advertisement---

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने रविवारी (17 सप्टेंबर) दुसरा आशिया चषक 2023. भारतीय संघाच्या इतिहासात ही आठवी आशिया चषक ट्रॉफी ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला 10 विकेट्स राखून विजय मिळवता आला. वनडे विश्वचषकापूर्वी भारताने ही महत्वाची स्पर्धा जिंकली असून संघ मायदेशात परतला आहे. यावेळी मुंबई विमानतळावर रोहित शर्माच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

भारतीय संघाला रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 2018 साली देखील आपल्या नेतृत्वात आशिया चषक जिंकवून दिला होता. रविवारी (17 सप्टेंबर) त्याच्या नेतृत्वात संघाने दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आपल्या मर्सडीज एस क्लास गाडीतून निघाला होता. रोहित ही दोन कोटी रुपयांची गाडी स्वतः चालवत होता आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडे होत्या. पण रोहितचे देखील बाहेर लक्ष होते. त्याने विमानतळाच्या गेटवर उभ्या असणाऱ्या चाहत्यांसाठी गाडी थांबवली आणि खाली उतरून सर्वांसोबत फोटो देखील घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहितव्यतिरिक्त विराट कोहली देखील आपल्या महागड्या मर्सडीज बेंझ जीएलएस गाडीत बसून गेला. श्रेयस अय्यर देखील विमानतळावरून स्वतः आपली जी वॅगन गाडी चालवताना दिसला. दरम्यान, आगामी आशिया चषकापूर्वी भारताला मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यावर्षी विश्वचषक भारतात असल्यामुळे मायदेशात रोहितच्या नेतृत्वातील संघ चांगली कामगिरी, करताना दिसू शकतो. मागच्या 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीचा पडलेला दुःष्काळ यावर्षी विश्वचषक जिंकून संघ संपवेल, अशी सर्वांचीच इच्छा आहे. (Outside the Mumbai airport, Rohit Sharma stopped his car for fans and took pictures)

महत्वाच्या बातम्या – 
गंभीरच्या मनातही धोनीविषयी आदर! माजी दिग्गजाचे नवे विधान ऐकून तुम्हालाही नाही बसणार विश्वास
वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला 440 व्होल्टचा झटका! संघाचा हुकमी एक्का Injured, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---