आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनले आहेत. त्यात एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि कपिल देव यांच्या नावाचा समावेश आहे. बायोपिकची नावे ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’, ‘अजहर’ आणि ’83’ अशी आहेत. मात्र, अलीकडेच बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने काही अभिनेत्यांची नावे सांगितली, जे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या बायोपिकमध्ये त्यांचे पात्र साकारू शकतात.
कोणाचे घेतले नाव?
अलीकडेच स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिने सांगितले की, ते कोणते साऊथ अभिनेते आहेत, जे रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारू शकतात. यावेळी तमन्नाने सर्वप्रथम विराट कोहलीच्या बायोपिकसाठी (Virat Kohli Biopic) अभिनेता निवडला. तिने यासाठी ‘बाहुबली’ फेम प्रभास (Prabhas) याची निवड केली.
रोहितसाठी सेतुपती, तर जडेजासाठी अल्लू अर्जुन
तसेच, तिने रोहित शर्मा याच्या बायोपिकसाठी ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांना निवडले. युझवेंद्र चहल याच्या बायोपिकसाठी तिने राम चरणचे (Ram Charan) नाव घेतले. त्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या बायोपिकसाठी धनुष (Dhanush) याचे नाव घेतले. रवींद्र जडेजाच्या बायोपिकसाठी तिने ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या नावाचा सल्ला दिला. मात्र, यावेळी तिने आपला बॉयफ्रेंड विजय वर्मा (Vijay Varma) याचे नाव घेतले नाही.
आयपीएलमध्येही दिसली होती तमन्ना
आयपीएल 2023 स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीला तमन्ना भाटिया हिने रश्मिका मंधना आणि अरिजित सिंग यांच्यासोबत परफॉर्म केला होता. यानंतर तिने आपला आवडता क्रिकेटपटू एमएस धोनी याचीही भेट घेतली होती.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने उंचावला आशिया चषक
भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत विजय साकारला. यासोबत भारताने सर्वाधिक 8व्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतही अशीच कामगिरी करावी, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. (actress tamannaah bhatia picks actors who can play biopic of virat kohli to rohit sharma these cricketers)
महत्वाच्या बातम्या-
‘गजिनी’ रोहित! बसमध्ये बसताना कॅप्टन हॉटेलमध्येच विसरला ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, सहकाऱ्यांनी घेतली मजा- Video
अर्रर्र…काय झालं! 140 कोटी भारतीयांमध्ये फक्त श्रद्धा कपूरच सिराजवर नाराज; म्हणाली, ‘आता त्यालाच विचारा…’