धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टी अनेकदा विसरतो, ही सामान्य बाब आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा कधी काय विसरेल याचा काही नेम नाही. खरं तर, 2017मध्ये एका मुलाखतीत विराट कोहली याने म्हटले होते की, रोहित शर्मा काहीही विसरू शकतो. यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला रोहित नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा, हेच विसरून गेला होता. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने आपला निर्णय घेतला होता. असेच काहीसे आशिया चषक 2023 स्पर्धा संपल्यानंतर रोहितचा ‘गजनी’ अंदाज पाहायला मिळाला.
रोहित शर्मा पासपोर्ट विसरला
‘हिटमॅन’ नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) भारत विरुद्ध श्रीलंका सामना संपल्यानंतर कोलंबो येथून रवाना झाला. रोहितने सर्वात शेवटी गेला. कारण, त्याला तोपर्यंत लक्षात आले होते की, तो पासपोर्ट विसरला (Rohit Sharma Forget Passport) आहे. ज्यावेळी सहकाऱ्यांना हे समजले, तेव्हा ते टाळ्या वाजवू लागले. अशात रोहित गोंधळलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याने त्याचा पासपोर्ट आणून दिला. यानंतर बस निघून गेली. आता यादरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
Virat Kohli in 2017 – I haven't seen anyone forget things like Rohit Sharma does. He even forgets his iPad, passport.
Tonight – Rohit forgot his passport, and a support staff member gave it back to him. (Ankan Kar). pic.twitter.com/3nFsiJwCP4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
दुसऱ्यांदा बनवले चॅम्पियन
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्यांदा आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेचा किताब जिंकला आहे. 2018मध्ये विराट कोहली भारतीय संघाचा नियमित कर्णधार होता. मात्र, तो स्पर्धेत खेळत नव्हता. त्यावेळी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने यूएईमध्ये आशिया चषक (Asia Cup) खेळला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात बांगलादेशला पराभूत करत भारताने किताब जिंकला होता. आता भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात 10 विकेट्सने पराभवाची धूळ चारत स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला.
पुढील महिन्यात क्रिकेटचा महाकुंभमेळा
पुढील महिन्यापासून (5 ऑक्टोबर) भारतात आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचा महाकुंभमेळा सुरू होणार आहे. भारताने अखेरचा विश्वचषक 2011मध्ये जिंकला होता. त्यानंतर 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. हे दोन्ही किताब एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली आले होते. आता चाहत्यांना आशा आहे की, रोहितच्या नेतृत्वात आशिया चषकाप्रमाणे भारतीय संघ विश्वचषकही जिंकेल. भारत 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकाचे अभियान सुरू करेल. (captain rohit sharma forget his passport in hotel asia cup 2023 video viral)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र…काय झालं! 140 कोटी भारतीयांमध्ये फक्त श्रद्धा कपूरच सिराजवर नाराज; म्हणाली, ‘आता त्यालाच विचारा…’
आशिया चषक विजेता कॅप्टन Rohitचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘मी विचारच केला नव्हता…’