---Advertisement---

Video: पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार प्रेस कॉन्फरन्समध्ये आला, पण स्कॉटीश फॅन्सने घातला ‘असा’ गोंधळ,

---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या फेरीतील ‘गट ब’चे दोन सामने खेळले गेले. पाहिला सामना पापुआ न्यू गिनी आणि ओमान यांच्यात झाला. ओमानने या सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. तर, दुसरा सामना बांगलादेश आणि स्कॉटलँड यांच्यात झाला. या सामन्यात नवख्या स्कॉटलँडने बांगलादेशला सहा धावांनी पराभूत केले आणि सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

स्कॉटलँडने केलेल्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह माध्यांमशी बोलण्यासाठी आला होता. अशातच स्कॉटलँड संघाच्या चाहत्यांनी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

क्रिकेट स्कॉटलँडने हा व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेट स्कॉटलँडने शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सॉरी पुढच्या वेळी आम्ही एवढा गोंधळ करणार नाही.”

व्हिडिओत दिसत आहे की, बांगलादेशाचा कर्णधार पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात करतो आणि लगेचच स्कॉटलँड संघाचे चाहते त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत गाऊ लागतात. चाहत्यांनी राष्ट्रगीत गायला सुरुवात केल्यामुळे बांगलादेशच्या कर्णधारारला नाईलाजाने थोड्या वेळासाठी शांत बसावे लागले. चाहत्यांचे राष्ट्रगीत गाऊन झाल्यानंतर मात्र महमूदुल्लाहला बोलण्याची संधी मिळाली.

तो माध्यामांशी बोलताना म्हणाला की, “साहजिकच मी निराश आहे आणि माझ्या निराश होण्याचे काही कारण नाहीये. आम्ही आमच्या फलंदाजीविषयी चिंतित आहोत आणि आम्हाला आमची फलंदाजी चांगली करायची आहे. याव्यतिरिक्त आम्हाला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे, कारण आमची गोलंदाजी खूप खोल आहे. मला आमचे सलामी फलंदाज लिटन दास आमि सौम्य सरकार यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.’

‘मला वाटते की, आम्ही सामन्यात पावर प्लेमध्ये धावा करण्यात अपयशी ठरलो, ज्याचा आम्ही उपयोग केला पाहिजे होता. जेव्हा तुम्ही अशाप्रकारच्या धावसंख्याचा पाठलाग करत आहात, तेव्हा तुम्हाला वरच्या फळीकडून धावांची आवश्यकता असते. मध्येच शाकिब आणि मुशफिकुरने पुनरागमन केले, पण आम्ही पुन्हा रस्ता भटकलो.”

या सामन्यात स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १४० धावा केल्या होत्या. त्यानंतर १४१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिकच्या मुलाखतीदरम्यान ‘पापा’ म्हणत छोट्या अगस्त्यने घेतली सरप्राईज एन्ट्री, पाहा बाप-लेकाचा गोड व्हिडिओ

‘टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचणार नाही पाकिस्तान संघ’, माजी क्रिकेटरचा घरचा आहेर

टी२० विश्वचषकाची पहिली लढत सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेसाठी दुख:द बातमी, दिग्गज कर्णधाराचे निधन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---