---Advertisement---

अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातून पत्ता कट!

On: मंगळवार, जून 25, 2024 11:28 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताने बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. या चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने 8 धावांनी बांग्लादेशला मात दिला. या विजयासह अफगाणिस्तानच्या रुपात सेमीफायनल साठी पात्र ठरणारा चाैथा संघ मिळाला आहे. अफगाणिस्तानच्या विजयाने बांग्लादेश पाठोपाठ ऑस्ट्रेलिया देखील विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावा जोडल्या. मात्र यानंतर अफगाणिस्तानचे ठराविक अंतराने विकेट्स गेले. रहमानउल्ला गुरबाजने 55 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इब्राहिम झद्रानने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूत19 धावा देत शानदार पूर्ण केले. अशा प्रकारे अफगाण संघाने 20 षटकात 5 विकेट गमावत 115 धावांचे लक्ष्य बांग्लादेश समोर ठेवले.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघ अफगाणच्या गोलंदाजी समोर ढेपाळला. संघाकडून लिटन दास व्यतीरिक्त कोणत्याही फलंदाजस 15 धाव संख्या गाठता आली नाही. लिटन दास (54*) एक टोक सांभाळून शेवट पर्यंत नाबाद राहिला, त्याला आपली नाैका विजयापर्यंत पोहचवता आली नाही. कारण समोरुन कोणत्याही फलंदाजाकडून त्याल साथ मिळाली नाही. अफगाणिस्तान कडून गोलंदाजीत चमकदार कामगिरी पहायला मिळाली. सामनावीर नवीन उल हकने आणि कर्णधार राशिद खानने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर  बांग्लादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हाऊसेनने 4 षटकात 26 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

महत्तवाच्या बातम्या-

रोहितचा हिटमॅन अंदाज, ऑस्ट्रेलिया गोत्यात! टीम इंडिया इंग्लंड सोबत करणार हिशोब चुकता?
भारतानं केलं ऑस्ट्रेलियाचं अवघड, 24 धावांनी मात देत सेमी फायनलमध्ये थाटात एंट्री!
ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयकडून आगामी झिम्बाब्वे दाैर्यासाठी भारतीय संघाची घोषणा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---