बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना 32.2 षटकांत सर्वबाद 122 धावा केल्या. यामध्ये बांगलादेश संघाकडून या सामन्याद्वारे पुनरागमन करताना शाकीब अल हसनने 8 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या.
शाकीब अल हसनने एक वर्षाने मैदानावर पुनरागमन पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावर ही कारवाई केली होती, कारण त्याला मॅच फिक्सिंग करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. त्याने ही माहिती लपवली होती. त्यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. बांगलादेश संघाचा शाकीब अल हसन कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार राहिला आहे.
शाकीब अल हसनने आयसीसीच्या एँटी करप्शन युनिटच्या तीन नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. वर्षभराच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना धमाकेदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात 7.2 षटके गोलंदाजी करताना 2 षटके निर्धाव टाकली. त्याचबरोबर त्याने 1.1 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना 8 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या.
शाकीब अल हसनने आंद्रे मॅक्ग्राथी, जेसन मोहम्मद, नक्ररूमाह बोनेर आणि अल्झारी जोसेफ यांना बाद केले. त्याचबरोबर मुस्तफिजूरने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मेहंदी हसनने 1 विकेट घेतली. वेस्ट इंडिज संघाकडून सर्वाधिक धावा के मायर्सने केल्या. त्याने 56 चेंडूचा सामना करताना 4 चौकार आणि 1 षटकार खेचत 40 धावांची खेळी साकारली. त्या व्यतिरिक्त वेस्ट इंडिज संघाच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
या सामन्यात बांगलादेश संघाने 123 धावांचा पाठलाग करताना, तमिमने सलामीला येताना 69 चेंडूचा सामना 7 चौकार ठोकत 44 धावा केल्या. त्याचबरोबर शाकीब अल हसनने 19 धावा केल्या. यष्टीरक्षक रहीमने 31 चेंडूचा सामना करताना नाबाद 19 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेश संघाने 33.5 षटकांत 4 गडी गमावून 125 धावा करताना 6 विकेट्सने विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करताना अकील हुसेनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 26 धावा दिल्या. त्याचबरोबर जेसन मोहम्मदने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची या दिवशी होणार घोषणा
मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सने केदार जाधवसह या सहा मोठ्या खेळाडूंना केले मुक्त