भारतीय संघाने आपल्या युवा खेळाडूंच्या जोरावर दमदार प्रदर्शन करताना ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे भारतीय संघाने गाबा येथे 32 वर्षांनी प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघातील युवा खेळाडू आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांचे खूप कौतुक झाले. मात्र त्यानंतर भारतीय संघाचे माजी खेळाडू राहुल द्रविड सुद्धा चर्चेत आले आहेत.
Thank you Rahul Dravid for confirming that future of Indian cricket is in safe hands.
G.O.A.T ???? ❤ pic.twitter.com/1FpSJaOQBN
— ` (@rahulmsd_91) January 19, 2021
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी गाबा ऐतिहासिक विजय मिळविला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला गाबा येथे 1988 नंतर प्रथमचnपराभव स्विकारावा लागला आहे. तसेच भारतीय संघाचे माजी खेळाडू राहुल द्रविड हे भारतीय संघातील खेळाडूंपासून दूर आहेत. मात्र तरीही आता म्हणले जात आहे की, भारतीय संघाच्या विजयामागे राहुल द्रविड यांचा हात आहे. याचे कारण म्हणजे भारतीय संघ आपल्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरला होता. या मालिकेत भारतीय संघातून 5 युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
In an office at the NCA in Bangalore, Rahul Dravid must be watching and feeling proud of the India A and India U19 programs he's developed, which gave India their depth.
Then, he'll quietly get back to work planning the next series.
— Snehal Pradhan (@SnehalPradhan) January 19, 2021
त्यामुळे भारतीय संघातील युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला जो विजय मिळाला. त्या सामन्यात भारतीय संघाचे युवा खेळाडू रिषभ पंत, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांचे योगदान महत्वाचे होते. खास गोष्ट ही आहे की, या सर्व युवा खेळाडूंना घडवण्यामागे भारतीय संघाचे माजी खेळाडू राहुल द्रविड यांचा हात आहे.
He is NOT on Twitter but #RahulDravid is the man behind the rise of all these players at National Cricket Academy and India `A' : Gill, Shardul, Sundar, Siraj, Saini, Pant…Let us hail Dravid the astute cricket mind even as we celebrate the feat Down Under????????????????
— Vijay Lokapally ???????? (@vijaylokapally) January 19, 2021
https://twitter.com/imanjitBackup/status/1351486203606953986?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1351486203606953986%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D114164action%3Dedit
राहुल द्रविड, ज्यांना भारतीय संघाची भिंत म्हणले जाते. त्यांनी भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर, भारतीय संघाच्या 19 वर्षांखालील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2016 ते 2019 या दरम्यान शुबमन गिल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि पृथ्वी शा सारख्या बर्याच युवा खेळाडूंना प्रशिक्षण देउन घडविण्याचे काम केले. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करून या युवा खेळाडूंनी भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान निर्माण केली. द्रविड येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतीय खेळाडूंच्या फिटनेस आणि गरजांवर लक्ष दिले. ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरू येथे या अकादमीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर नवीन खेळाडूंना घडवण्याचे काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सने केदार जाधवसह या सहा मोठ्या खेळाडूंना केले मुक्त
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय