न्यूझीलंडनंतर भारताचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यात अनेकांना विश्रांती दिली होती, आता ते बांगलादेशच्या दौऱ्यात परतले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांचा समावेश आहे. बांगलादेश दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार आहे. बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) पहिला वनडे सामना रविवारी (4 डिसेंबर) शेर ए बांगला स्टेडिय, ढाका येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली असता नाण्याचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आहे.
बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कुलदीप सेन (Kuldeep Sen) याचे पदार्पण झाले आहे. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच भारताच्या संघातून विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट करत याची माहिती दिली. त्याच्याजागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. त्याचबरोबर अक्षर पटेल हा देखील पहिल्या सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध राहिला नाही.
पंतच्या जागी विकेटकिपींगची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्यावर सोपवण्यात आली आहे. या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असण्याची शक्यता अंजूम चोप्रा यांनी दर्शवली आहे.
पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन-
भारताचा संघ– रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन (पदार्पण).
???? Toss & Team News ????
Bangladesh have elected to bowl against #TeamIndia in the first #BANvIND ODI.
Follow the match ???? https://t.co/XA4dUcD6iy
A look at our Playing XI ???? pic.twitter.com/cwbB8cdXfP
— BCCI (@BCCI) December 4, 2022
बांगलादेश संघ- लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान.
TOYAM Sports Limited ODI Series: Bangladesh vs India: 1st ODI
Bangladesh Playing XI#BCB | #Cricket | #BANvIND pic.twitter.com/dB7CwTGzxq
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 4, 2022
वनडे मालिकेतील उर्वरित सामने 7 आणि 10 डिसेंबरला खेळले जाणार आहेत. Bangladesh win the toss and bowl vs IND in first ODI
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केवळ 3 धावा! ढाकामध्ये रोहितला भारताच्या माजी कर्णधाराचा विक्रम मोडण्याची संधी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 18: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर






