आशिया चषक 2023चा चौथा सामना बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. 335 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला अफगाणिस्तान संघ 44.3 षटकात 245 धावा करून सर्वबाद झाला. 45व्या षटकात तस्किन अहमद गोलंदाजीसाठी आला होता आणि या षटकात अफगाणिस्तानच्या दोन विकेट्स गेल्या. संघ पराभूत झाला असला, तर अफगाणिस्तानच्या विजयासाठी राशिद खान याने शेवटपर्यंत प्रयत्न केले.
बांगलादेशसाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर मेहदी हसन मिराझ आणि मजमूल हुसेन शांतो यांना वैयक्तिक शतके केली होती. गोलंदाजी विभागात तस्किन अहमद यांने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या विकेट्स घेताना त्याने 8.3 षटकात 44 धावाही खर्च केल्या. शोरिफूल इस्लाम यानेही 9 षटकात 36 धावा खर्च करून तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. (Bangladesh won the match against Afghanistan by 89 runs)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! आशिया चषक अर्ध्यात सोडून बुमराह मायदेशात, वेगवान गोलंदाज नाही खेळणार नेपाळविरुद्धचा सामना
पाकिस्तान कॅम्पमध्ये सेलिब्रेट झाला विस्फोटक फलंदाज वाढदिवस, पाहा खास व्हिडिओ