आयर्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन वनडे, तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने 183 धावांनी विजय मिळवला होता. तर गुरुवारी (23 मार्च) तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा बांगलादेशने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. मालिकेतील दुसऱ्या सामना पावसामुळे निकाली नघू शकला नाही. पहिल्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशला मिळालेला विजय हा त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला.
तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत बांगलादेशला विजय मिळाला असून वनडे फॉरमॅटमधील हे त्यांचे सर्वात मोठे विजय ठरले आहेत. आयर्लंड संघावर या मालिकेत बांगलादेशने अक्षरशः गुडघे टेकण्याची वेळ आणली. पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेश संघ 183 धावांच्या मोठ्या फरकाने विजयी झाला होता. बांगलादेश क्रिकेट संघाच्या इतिहासातील धावांच्या हिशोबाने हा सर्वात मोठा विजय होता. या मोठ्या कामगिरीनंतर गुरुवारी बांगलादेशने अजून एक मोठी उपलब्धी मिळवली.
तिसऱ्या वनडे सामन्यात 10 विकेट्सने विजय म्हणजे बांगलादेशसाठी विकेट्सच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा बांगलादेशने एखाता वनडे सामना 10 विकेट्सच्या अंतराने जिंकला आहे. विशेष म्हणजे बांगलादेशने विकेट्स आणि धावांच्या बाबतीत वनडे क्रिकेटमधील हे दोन सर्वात मोठे विजय एकाच मालिकेत मिळवले आहेत. आयर्लंडने या वनडे मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारला.
उभय संघांतील तिसऱ्या वनडे एकंदरीच विचार केला तर नाणेफेक गमावल्यानंतर बांगलादेशला प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम गोलंदाजी करताना बांगलादेशने आयर्लंडने अवघ्या 28.1 षटकात 101 धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने अवघ्या 13.1 षटकांमध्ये नाबाद 102 धावा केल्या आणि सामना नावावर केला. गोलंदाजांमध्ये बांगलादेशसाठी हसन महमूद याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तस्किन अहमद याने 3, तर इबादत हुसैन यायने 2 विकेट्स घेतल्या.
(Bangladesh’s record two wins in an ODI series, third ODI won by 10 wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलआधी पंजाबसाठी थोडी खुशी थोडा गम! हुकमी एक्का बाहेर, दोन धुरंधर मोहालीत दाखल
“आयपीएल सुरू झाल्यावर असे पराभव विसरले जातील”, दिग्गजाने कर्णधार व प्रशिक्षकांना सुनावले