---Advertisement---

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी

On: रविवार, ऑक्टोबर 30, 2022 12:17 PM
Bangladesh Team
---Advertisement---

टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुपर 12चा सामना खेळला गेला. हा सामना ब्रिसबेनच्या गाबावर खेळला गेला. मागील सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभूत करत या स्पर्धेत आपले आव्हाव कायम राखले होते. यामुळे ते पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्ध याची पुनरावृत्ती करतील आशा व्यक्त केली जात होती, मात्र बांगलादेश वरचढ ठरले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे केवळ 3 धावांनी पराभूत झाला.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर सौम्य सरकार शून्यावर बाद झाला. काही अंतराने बांगलादेशच्या विकेट्स पडतच राहिल्या. बांगलादेशची स्थिती 5.3 षटकात 2 विकेट्स 32 धावा अशी होती. त्यांचा सलामीवीर नजमुल शांतो हा मात्र टिकून खेळला. त्याने 55 चेंडूत 71 धावा केल्या. यामुळे बांगलादेशने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 150 धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेकडून रिचर्ड नागरावा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी उत्तम गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे पहिले तीन फलंदाज एकेरी धावा करताच बाद झाले. चौथ्या क्रमांकावर सीन विलियम्स याने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने 42 चेंडूत 64 धावा केल्या. तरीही त्या कमी पडल्या कारण त्याने रेगिस चकाब्वा, विलियम्स आणि रेयान बर्ल वगळता कोणताही झिम्बाब्वेचा फलंदाज 10 धावांच्या पुढे गेला नाही. त्यातच आज सिकंदर रझा याचा दिवस नव्हता, कारण त्याने 4 षटकात 35 धावा देत एक विकेट आणि फलंदाजी करताना शून्यावर बाद झाला. यामुळे झिम्बाब्वे 20 षटकात 8 विकेट्स गमावत 147 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला.

शेवटचे थरारक षटक
झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. मोसाद्देक हुसेन गोलंदाजी करण्यासाठी आला. झिम्बाब्वेने पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर ब्रॅड इवान्स याची विकेट गमावली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिचर्ड नागरावा याने चौकार मारला, पंचांनी त्याला बाईज म्हणून अतिरिक्त ठरवले. त्यांनतर त्याने पुढच्याच चेंडूवर षटकार खेचत सामना झिम्बाब्वेच्या पक्षात आणला होता, मात्र षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. शेवटचा चेंडू नो बॉल दिल्याने झिम्बाब्वेकडे जिंकण्याची अजून एक संधी होती. पण ब्लेसिंग मुजरबानी ना चांगला शॉट खेळू शकला ना एकेरी धाव घेऊ शकला आणि त्यांनी हा सामना गमावला. सामनावीर तस्किन अहमद ठरला.

या विजयामुळे बांगलादेशचे भारताएवढेच 4 गुण झाले आहेत, मात्र कमी नेट रनरेटमुळे ते सुपर 12च्या दुसऱ्या ग्रुपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पर्थमध्ये पाकिस्तानची झिम्बाब्वेविरुद्ध एक ‘चूक’, भारताला सामना जिंकण्यास त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल
मिताली राज करतेय नव्या क्षेत्रात पदार्पण! मुहूर्तही ठरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---