---Advertisement---

पर्थमध्ये पाकिस्तानची झिम्बाब्वेविरुद्ध एक ‘चूक’, भारताला सामना जिंकण्यास त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल

On: रविवार, ऑक्टोबर 30, 2022 11:07 AM
Team India
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जाणार आहे. यातील दोन सामने पर्थ येथे खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स आणि दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा आहे. पाकिस्तानचा पर्थमध्ये हा दुसरा सामना असणार आहे. त्याआधी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभव स्विकारावा लागला होता. सामना जिंकायचा असेल तर पाकिस्तानने पर्थमध्ये जी चूक केली ती भारताला टाळावी लागणार आहे.

पाकिस्तानचा झ्म्बिाब्वेविरुद्धच्या पराभव या टी20 विश्वचषकातील सलग दुसरा पराभव होता. यामुळे त्यांच्यावर उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तानने एक चूक केली जी त्यांना फारच महागात पडलेली दिसत आहे. त्यांना सामना अवघ्या एका धावेने गमवावा लागला.

झाले असे की, पर्थची खेळपट्टी सर्वाधिक वेगवान मानली जाते. सध्या सामने नव्या स्टेडियममध्ये होत असले तरी खेळपट्टी काही बदलेली नाही. या मैदानावर टी20 विश्वचषकाचे तीन सामने खेळले गेले. ज्यामध्ये वेगवान गोलंदाजांनी विरोधी संघाची कंबरच मोडली.

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम याने उत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यामुळे झिम्बाब्वेचा संध 130 धावसंख्याच उभारू शकला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी निराशाजनक झाली हे खरे, मात्र गोलंदाजांचीही अधिक चूक होती. ज्याची पुनरावृत्ती भारताला टाळावी लागणार आहे.

पाकिस्तानच्या गोलंदाजीची सुरूवात झाली तेव्हा स्विंग आणि उसळी अधिक असूनसुद्धा त्यांनी फुल लेंथ गोलंदाजी केली. पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदी याने फुलटॉस टाकला. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी संपूर्ण पॉवरप्लेमध्ये अशीच गोलंदाजी केली आणि अधिक विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. झिम्बाब्वेची पहिली विकेट पाचव्या षटकात पडली. तोपर्यंत क्रेग इर्विन आणि वेस्ली मॅधवीयर यांनी 42 धावांची भागीदारी केली होती.

पर्थच्या खेळपट्टीवर गोलंदाज म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर हार्ड लेंथवर चेंडू टाकले पाहिजे. यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यासाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत आणि फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले पाहिजे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी धोका! 7 डाव.. 2 शतके आणि 1 अर्धशतक ‘हा’ आफ्रिकन फलंदाज 6 वर्षांनंतर संघात
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---