बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. ढाकामध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले. जे छोटे दिसत असले तरी भारतासाठी कठीण ठरत आहे, कारण भारत एका पाठोपाठ एक विकेट गमावत चालला आहे. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी (24 डिसेंबर) भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 19.5 षटकात 37 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. आता भारताने चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात विकेट्स गमावल्या. यामुळे हा सामना रोमांचक होत चालला आहे.
लक्ष्य मोठे नाही तर इतिहास भीतीदायक आहे. काही वर्षापूर्वीही असेच काहीतरी झाले होते. तेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही मिळून 100 धावा करता आल्या नव्हत्या. तेव्हा भारताला घरच्याच मैदानावर इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले होते.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना 2006मध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. 18 ते 22 मार्च या दरम्यान खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताचा दुसरा डाव केवळ 100 धावसंख्येवर आटोपला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 279 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 191 धावा करत भारताला 313 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यावेळी भारत केवळ 100 धावाच करू शकला आणि इंग्लंडने 212 धावांनी सामना जिंकला होता.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताची चौथ्या दिवशी निराशाजनक सुरूवात झाली. भारताने जयदेव उनाडकट आणि भरवशाचा रिषभ पंत यांची विकेट गमावली. उनाडकट 13 धावा आणि पंत 9 धावा करत तंबूत परतले.
Shakib Al Hasan strikes early as Jaydev Unadkat goes back for 13 ☝️#WTC23 | #BANvIND | 📝 https://t.co/ZTCALEErfJ pic.twitter.com/mGf0AXblzK
— ICC (@ICC) December 25, 2022
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्यांनी 227 धावा केल्या होत्या. बदल्यात भारताने पहिल्या डावात 314 धावसंख्या उभारली होती. बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावसंख्येवर संपुष्टात आला होता. यामुळे भारताला 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे सुरुवातीला सोपे वाटत होते, मात्र बांगलादेशने ज्याप्रकारे गोलंदाजी केली. ते पाहून भारताचा विजय दूर होत चालला आहे.
या मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांनी जिंकला होता. ज्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही
नॉर्थ ईस्ट युनायटेडने अखेर पहिला विजय मिळवला; एटीके मोहन बागानला धक्का दिला