भारतीय महिला संघाचा बांगलादेश दौरा शनिवारी (23 जुलै) संपला. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मैदानी पंचांमध्ये चकमक झाली होती. यावेळी हरमनप्रीतने स्टंपला बॅट मारत नाराजी व्यक्त केली. पण लाईव्ह सामन्यात दाखवेलली ही नाराजी तिला महागात पडली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या या वनडे मालिकेत भारताला विजय मिळवता आला नाही. शेवटचा वनडे सामना बरोबरीत सुटला आणि मालिका देखील 1-1 अशा बरोबरीतच सुटली. शेवटच्या वनडे सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने मैदानात केलेल्या गैरवर्तनासाठी तिला 75 टक्के मॅच फिट दंड म्हणून भरावी लागणार आहे. एवढेच नाही, आयसीसीकडून तीन डिमेरीट पॉइंट देखील मिळाले आहेत.
Harmanpreet Kaur set to be fined (Cricbuzz):
– 75% match fees.
– 3 Demerit Points. pic.twitter.com/nJ5RMubIUJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 23, 2023
आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला 24 महिन्यांच्या आतमध्ये चार डिमेरीट पॉइंट्स मिळाले, तर त्याला एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यातून बाहेर बसावे लागते. शनिवारी घातलेल्या वादानंतर हमरनप्रीतला तीन डिमेरीट पॉइंट्स मिळाले आहेत. अशात येत्या 24 महिन्यांमध्ये अजून एक डिमेरीट पॉइंट जर तिला मिळाला, तर आयसीसीकडून तिच्यावर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यात बंदी घातली जाईल. कर्णधार हरमनप्रीतवर ही कारवाई झाली, तर नक्कीच संघाला त्याचे नुकसास भोगावे लागू शकते.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश महिला संघांमधील या सामन्याच विचार केला, तर संघाला विजयासाठी अवघी एक धाव कमी असताना मेघना सिंग बाद झाली आणि सामना बरोबरीवर सुटला. मेघनाच्या रुपात भारताने शेवटची विकेट गमावली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 4 बाद 225 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर भारताने 49.3 षटकात 225 धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. (BANw vs INDw 3rd ODI | Harmanpreet Kaur fined 75% match fees and 3 Demerit Points.)
महत्वाच्या बातम्या –
अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा । चेन्नई लायन्सचा गोवा चॅलेंजर्सवर विजय, शरत कमलने उडवला हरमीतचा धुव्वा
अजिंक्य रहाणेने एका हातात पकडला स्टनिंग कॅच! फलंदाजालाही नाही बसला विश्वास