भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघ तिसऱ्या दिवसाखेर 209 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी 67 षटकांमध्ये एकूण 143 धावा केल्या. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने तिसऱ्या दिवशी घेतलेला एक झेल चर्चेचा विषय ठरत आहे. रहाणेने चपळाई दाखवल्यामुळे वेस्ट इंडीजच्या जर्मेन ब्लॅकवुड तंबूत परतला.
भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने 1 बाद 86 धावा केल्या होत्या. संपूर्ण तिसरा दिवस वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर काय रोवून ठेवले आणि संघाची धावसंख्या 5 बाद 229 पर्यंत नेली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट 235 चेंडू खेळून 75 धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या जर्मेन ब्लॅकवूड (Jermaine Blackwood) यानेही 92 चेंडू खेळले होते आणि खेळपट्टीवर सेट झाला होता. पण वैक्तिक 20 धावांवर त्याने रहाणेच्या हातात झेल दिला आणि खेळपट्टी सोडावी लागली. डावातील 87व्या षटकात रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत असताना रहाणेने स्लिप्समध्ये हा झेल घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What an outstanding catch by Ajinkya Rahane in the slips.
Flying Rahane! pic.twitter.com/GesmVS0jMp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2023
Good sharp catch from Rahane 👏👏👏 pic.twitter.com/NNA1D0e7Bo
— Raja 🇮🇳 (@Raja15975) July 22, 2023
वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज टगेनरीन चंद्रपॉल याने दुसऱ्या दिवशी वैयक्तिक 33 धावांवर विकेट गमावली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवसी क्रेक ब्रेथवेट, जर्मेन ब्लॅकवूड, कर्क मॅकेन्झी आणि यष्टीरक्षक जोशुआ डा सिल्वा यांनी विकेट्स गमावल्या. रविचंद्रन अस्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांच्यासह पदार्पणाच्या सामन्यात मुकेश कुमार यालाही तिसऱ्या दिवशी विकेट मिळाली. उभय संघांतील या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 0-1 अशा आघाडीवर आहे. अशात दुसरा सामना अनिर्णित जरी झाला, तरी मालिका भारताच्या नावावर होईल. पण वेस्ट इंडीजने जर दुसरा सामना जिंकला, तर मालिका बरोबरीत सुटेल. (WI vs IND 2nd Test । Ajinkya Rahane caught a stunning catch in one hand! Even the batsman couldn’t believe it)
महत्वाच्या बातम्या –
अप्रतिम चेंडूवर अश्विनने केली ब्रेथवेटची शिकार! विकेट गमावल्यानंतर यजमानांच्या कर्णधार आवाक
WI vs IND । तिसरा दिवस जयमान संघाच्या नावावर, पण भारताची आघाडी कायम