भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित होण्याची शक्यता दिसत आहे. तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 5 बाद 229 धावा केल्या आहेत. भारतीय संघ 209 धावांनी आघाडीवर आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार आणि सलामीवीर क्रेक ब्रेथवेट चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण रविचंद्रन अश्विन याच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे फॉर्ममध्ये असलेल्या ब्रेथवेटही अपयशी ठरला. वेस्ट इंडीजचा कर्णधार बाद झालेल्या चेंडूसाठी अश्विनचे कौतुक होत आहे.
दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजची धावसंख्या 1 बाद 86 धावा होती. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजला पहिला झटका बसला कर्क मॅकेन्झी (32) याच्या रुपात. दिवसातील दुसरी विकेट रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याची घेतली. वेस्ट इंडीजच्या डावातील 73वे षटक टाकण्यासाठी अश्विन आला होता. षटकातील चौथा चेंडू त्याने इनस्विंग टाकला जो ब्रेथवेटचे पॅड आणि बॅटच्या मधून थेट स्टंप्समध्ये घुसला. अश्विनच्या या चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याचे कौतुक देखील केले जात आहे.
ब्रेथवेटने 235 चेंडूत सर्वाधिक 75 धावांची खेळी केली आणि तंबूरत परतला. तिसऱ्या दिवशी भारतासाठी अश्विनव्यतिरिक्त मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली होती. भारतीय संघाचा पहिला डाव 128 षटकांमध्ये 438 धावांवर गुंडाळला गेला. शेवटच्या दोन दिवसांमध्ये फलंदाज असेच संयमी खेळत दाखवत राहिले, तर सामना अनिर्णित होण्याची पूर्ण शक्यता आहे.
मालिका जिंकण्यासाठी भारताला हा सामना अनिर्णित करायचा आहे. अशात मालिका भारताच्या नावावर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. वेस्ट इंडीजने हा सामना जिंकला, तर मात्र मालिका बरोबरीवर सुटेल. (Kraigg Brathwaite lost his wicket on the spin of Ravichandran Ashwin)
महत्वाच्या बातम्या –
WI vs IND । तिसरा दिवस जयमान संघाच्या नावावर, पण भारताची आघाडी कायम
लढवय्या लॅब्युशेन! ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यासाठी एकाकी झुंज देत ठोकले शतक