---Advertisement---

लढवय्या लॅब्युशेन! ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यासाठी एकाकी झुंज देत ठोकले शतक

---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जात आहे. शनिवारी (22 जुलै) म्हणजेच सामन्याच्या चौथ्या दिवशी पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाठी फलंदाज मार्नस लॅब्युशेन याने झुंजार शतक झळकावत सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. हे त्याच्या कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक ठरले.

मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर चौथ्या कसोटीतही ते तिसऱ्या दिवसाखेर आघाडीवर होते. त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला 4 बाद 118 असे रोखले होते. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे काहीसा उशिरा सुरू झाला. तिसऱ्या दिवशी नाबाद असलेले लॅब्युशेन व मिचेल मार्श यांनी अगदी झुंजाररित्या इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत त्यांना यश मिळू दिले नाही. दोघांनी यादरम्यान शतकी भागीदारी पूर्ण केली. लॅब्युशेनने यावेळी आपल्या कसोटी कारकिर्दीतील अकरावे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका खेळत असतानाही त्याचे पहिले शतक ठरले.

शतक झळकावल्यानंतर मात्र तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. जो रूटला कट मारण्याचा प्रयत्नात तो यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो याच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याने बाद होण्यापूर्वी 173 चेंडूंमध्ये दहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 111 धावा बनवल्या.

चौथ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा मार्श 31 तर ग्रीन 3 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलिया अद्यापही 61 धावांनी पिछाडीवर असून, सामना वाचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

(Marnus Labuchagne Hits 11th Test Century At Manchester Ashes 2023)

महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतचा रूद्रावतार! सामन्यानंतर काढले बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वाभाडे, म्हणाली…
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---