सीपीएल २०२० मधील दुसरा सामना २०१९ च्या सत्राचा विजेता बार्बाडोस ट्रायडेंट्स व सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्स यांच्यात ब्रायन लारा मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर कॅरेबियन प्रिमियर लिगच्या रुपाने मोठी टी-२० स्पर्धा खेळवण्यात येत आहे.
जेसन होल्डरच्या नेतृत्वात खेळणारा बार्बाडोस ट्रायडेंट्स विजेतेपद टिकवण्यास मैदानात उतरेल. एकीकडे बार्बाडोसच्या संघाची फलंदाजी कागदावर कमजोर जरी वाटत असली तरी रशिद खान व मिशेल सॅंटनरसारखे तगडे फिरकी गोलंदाज गोलंदाज आहेत तर दुसरीकडे सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्सकडे ख्रिस लिन, एव्हिन लुईस व बेन डंक सारखे तगडे फलंदाज तर कॉट्रेल, तन्वीर व जोसेफसारखे गोलंदाज सुद्धा आहेत.
पीसीएल २०२० मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या ख्रिस लिनची कर्णधारपदी तर सीपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोन्सन चार्ल्सला उपकर्णधारपदी नियुक्ती महत्त्वाची असेल.
ड्रीम ११ – ख्रिस लिन (कर्णधार), एव्हिन लुईस, जोन्सन चार्ल्स (उपकर्णधार), जोशुआ दा सिल्वा, बेन डंक, मिशेल सॅंटनर, सोहेल तन्वीर, राशिद खान, हेडन वॉल्श, शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ
बार्बाडोस ट्रायडेंट्स – जोन्सन चार्ल्स, शाय होप, शामरह ब्रुक्स, जोनाथन कार्टर, जस्टीन ग्रीव्ज, कोरी अॅडरसन, मिशेल सॅंटनर, जेसन होल्डर (कर्णधार), राशिद खान, हेडन वॉल्श ज्यु.,रेमन रिफर
सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्स – एव्हिन लुईस, ख्रिस लिन,बेन डंक, निक केली, जोशुआ दा सिल्वा, दिनेश रामदिन, इम्रान खान, रायद इम्रीत (कर्णधार), शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ, सोहल तन्वीर