पुणे। बार्सा अकॅडेमीने आज केलेल्या घोषणेनुसार पुण्यामध्ये चार फूटबॉल स्कूल्स सुरु केली जाणार आहेत. १४ जानेवारी २०२० पासून पुण्यातील हिंजवडी येथील ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल, विमान नगरमधील डॉन बॉस्को हायस्कूल, युरो स्कूल, उंड्री आणि लोयोला हायस्कूल, औंध येथे बार्सा अकॅडेमीची चार फूटबॉल स्कूल्स सुरु होतील.
ही फूटबॉल स्कूल्स म्हणजे बार्सा अकॅडेमीचे पुण्यातील चार कायमस्वरूपी बेस असतील आणि बार्सा अकॅडेमीचे टेक्निकल डायरेक्टर अल्बर्टो लेफूएंट रिंकन हे पुण्यात राहून या चारही फूटबॉल स्कूल्सवर लक्ष ठेवतील. १६ कोचेसच्या टीमचे नेतृत्व देखील रिंकन करतील. मुलांना फूटबॉलचे सर्वसमावेशक प्रशिक्षण संपूर्ण वर्षभर मिळत राहावे यासाठी प्रत्येक सेंटरवर आठवड्यातून तीन दिवस क्लासेस घेतले जातील. पहिल्या वर्षी सर्व सेंटर्सवर मिळून एकूण ४०० मुलांना प्रशिक्षण दिले जाईल.
फूटबॉल स्कूल्समध्ये प्रवेशासाठीच्या ट्रायल्स २३ व २४ नोव्हेंबर २०१९ आणि १३ व १४ डिसेंबर २०१९ रोजी वरील चार सेंटर्सवर घेतल्या जातील.
पुण्यामध्ये बार्सा अकॅडेमीची फूटबॉल स्कूल्स सुरु केली जाणार असल्याची घोषणा करताना बार्सा अकॅडेमी, एपीएसीचे प्रमुख कार्लोस पॅलाचिन यांनी सांगितले, “आजच्या काळात खेळ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रशिक्षण, कौशल्ये हे मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाचा अविभाज्य भाग बनले आहेत. खेळामध्ये नैपुण्य मिळवायचे असेल तर लहान वयापासून प्रशिक्षण आणि सराव आवश्यक आहे. भविष्यातील आघाडीचे फूटबॉलर्स तयार करण्यासाठीचा पाया आहे बार्सा अकॅडेमी फूटबॉल स्कूल. भारतात फूटबॉलचे उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी गेली आठ वर्षे आम्ही कार्यरत आहोत. भारतात फूटबॉलप्रेमींची संख्या प्रचंड मोठी आहे, या देशात उद्याचे गुणवान फूटबॉलर्स निर्माण झाले पाहिजेत या ध्येयाने आम्ही हे पाऊल उचलत आहोत.”
जानेवारी २०२० मध्ये होणार असलेल्या बार्सा अकॅडेमी एशिया पॅसिफिक कप २०२० च्या आयोजनाची तयारी भारतात सुरु असताना पुण्यामध्ये बार्सा अकॅडेमीची चार फूटबॉल स्कूल्स सुरु होणे हा अतिशय चांगला योगायोग आहे. या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या टुर्नामेंटमध्ये सहा देशांच्या ४८ टीम्स सहभागी झाल्या होत्या. या प्रचंड प्रतिसादामुळे स्पर्धेला मिळालेले यश लक्षात घेऊन भारताने यावर्षी देखील गुरुग्राम येथील बार्सा अकॅडेमीमध्ये ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० या काळात प्रीमियर इन्ट्रा-क्लब टुर्नामेंटचे आयोजन करत आहे.
एफसीबार्सिलोना हा भारतात आपली सेंटर्स सुरु करणारा पहिला मोठा युरोपियन क्लब आहे. २०११ मध्ये कॉन्शन्ट फूटबॉलसोबत त्यांनी नवी दिल्लीमधे पहिला एफसीबार्सिलोना कॅम्प आयोजित केला. हा कॅम्प प्रचंड यशस्वी झाला आणि तेव्हापासून देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये नियमितपणे या कॅम्पचे आयोजन केले जाऊ लागले. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे.
संपूर्ण जगभरातील युवा फूटबॉलर्सकडून प्रशिक्षणासाठी मागणी केली जात असल्यामुळे एफसीबी व सीएफने नवी दिल्लीमध्ये पहिली बार्सा अकॅडेमी सुरु करण्याचा निर्णय घेतला. एफसीबीकॅम्प्स व बार्सा अकॅडेमीतील कितीतरी खेळाडू एस्कोला इंटरनॅशनल टूर्नामेंट, एफसीबीक्लिनिक्स आणि अशाच इतर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बार्सिलोनाला जाऊन आले आहेत.
बार्सा अकॅडेमी इंडियातर्फे चालविल्या जाणाऱ्या अशा सर्व अकॅडेमीजची संख्या सर्वात जास्त असून त्याठिकाणी तब्बल ३०,००० पेक्षा जास्त खेळाडूंना प्रशिक्षण दिले गेले आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई आणि बंगलोर येथील बार्सा अकॅडेमीच्या फूटबॉल स्कूल्समध्ये सध्या २,००० पेक्षा जास्त युवा फूटबॉलर्स प्रशिक्षण घेत आहेत.
यावेळी कॉन्शन्ट फूटबॉलच्या डायरेक्टर अनुपमा जैन यांनी सांगितले, “२०११ मध्ये भारतात बार्सा अकॅडेमीला घेऊन येण्यासाठी जेव्हा आम्ही एफसीबार्सिलोनासोबत भागीदारी करत असताना आम्हाला पक्की खात्री होती की या भागीदारीमुळे आपल्या देशात फूटबॉल खेळाचा चेहरामोहरा पार बदलून जाईल. फूटबॉल अधिकाधिक चांगल्या पद्धतीने खेळणे हे बार्साचे अंगिकारण्याबरोबरीनेच बार्साची मूल्ये आचरणात आणण्यावर आणि सौहार्द निर्माण करण्यावर आम्ही भर दिला. आमच्या आजवरच्या प्रवासात आम्ही खेळाचा दर्जा वाढावा यासाठी तर प्रयत्न केलेच तसेच भारतातील मुलांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून त्यावर विशेष भर दिला. असे करत असताना बार्साची गुणवत्ता आणि मूल्ये यांना जराही धक्का लागू दिला नाही.”
बार्सा अकॅडेमीच्या प्रशिक्षण प्रणालीमध्ये कौशल्ये आणि नैपुण्यांच्या विकासावर भर दिला जातो आणि खेळाडूचा सर्वांगीण विकास घडविला जातो. फूटबॉल हा खेळ कसा खेळावा हे शिकविण्याच्याही पलीकडे जाऊन सौहार्द, मैत्री, विश्वास आणि निष्ठा ही बार्साची मूल्ये प्रत्येक खेळाडूच्या अंगी यावीत हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. भारतातील प्रशिक्षणामध्ये या सर्व मूल्यांचा समावेश केला गेला आहे. तसेच खेळाडूंचे फिटनेस, कंडिशनिंग, आरोग्य व पोषण, फिजिओथेरपी इत्यादी मूल्यवर्धित सेवा पुरविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. मुलांना तर याचा चांगलाच फायदा होतो पण अनेकदा त्यांच्या पालकांना देखील या सर्व उपक्रमांचा लाभ मिळतो. हे एकप्रकारे जीवन प्रशिक्षण आहे.
मेसी, इनिएस्टा यासारख्या जगद्विख्यात खेळाडूंना निर्माण करण्यात द्रोणाचार्यांची भूमिका बजावणारी बार्सा अकॅडेमी हा जगातील सर्वोत्तम युवा विकास कार्यक्रमांपैकी एक असल्यामुळे भारतीय वातावरणात भारतीय खेळाडूंना देखील या प्रशिक्षणाचे उत्तम लाभ मिळत आहे. भारताच्या १७ वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्क्वाडमध्ये प्रातिनिधीत्व असो किंवा हरयाणा आणि दिल्लीच्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर स्टेट टीम्समध्ये किंवा दिल्ली फूटबॉल लीगमध्ये, बार्सा अकॅडेमीचे विद्यार्थी आपली छाप उमटवू लागले आहेत. बार्सा अकॅडेमी ही भारतातील सर्वात मोठी फूटबॉल अकॅडेमी आहे आणि एआयएफएफने टॉप अकॅडेमी म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
एफसीबार्सिलोना
११९ वर्षांपूर्वी १८९९ मध्ये एफसी बार्सिलोनाची स्थापना करण्यात आली होती. या क्लबची मालकी याच्या १४५,००० पेक्षा जास्त सदस्यांकडे असून गेली अनेक वर्षे तो युरोप खंडातील सर्वाधिक यशस्वी क्लब म्हणून नावाजला जातो. २००४/०५ सीझनपासून या क्लबने पाच चॅम्पियन्स लीग स्पर्धा आणि नऊ डोमेस्टिक लीग स्पर्धा जिंकल्या आहेत.
कॉन्शन्ट फूटबॉल
कॉन्शन्ट फूटबॉल हा कॉन्शन्ट ग्रुपने दिल्ली एनसीआरमधील द हेरिटेज स्कूल नेटवर्कसोबत चालविलेला लहानवयापासून विकासाचा उपक्रम आहे. द हेरिटेज स्कूल नेटवर्क हे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील व्हेंचरचा एक भाग आहे. आज ही संस्था फूटबॉलसाठीच्या देशातील सर्वात मोठ्या विकास संस्थांपैकी एक म्हणून नावाजली जाते. फूटबॉल लीग्स, कॅम्प्स, प्रशिक्षण वर्ग, अकॅडेमी आणि एक्स्पोजर ट्रिप्स असे विविध प्रोग्रॅम्स ते आयोजित करतात. भारतात खेळाडूंचा व फूटबॉल खेळाचा विकास व्हावा हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.