---Advertisement---

मोठी चूक समजल्यावर बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांना झाला पश्चाताप

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 7:59 PM
---Advertisement---

अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धांसाठी बार्सिलोनाच्या महिला संघाने इकोनॉमी क्लास तर पुरूष संघाने बिझनेस क्लास मधून प्रवास केला. अधिकाऱ्यांनी हा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे चाहत्यांकडून कडाडून टिका होत आहे.

हे दोन संघ पोलंडवरून इबेरिया एअरलाईन्स चार्टरने अमेरिकेला रवाना झाले  तसेच या स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी या दोन संघानी एकत्र सराव केला.

इतिहासात बार्सिलोनाचे हे दोन संघ प्रथमच एकत्र स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे त्यांचे चाहत्यांनी खूप कौतुक केले.

मात्र या एका चूकीमुळे बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांना या चूकीचा पश्चाताप झाला.

विमानात चढण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकत्र फोटो काढून काही सोशल मिडियावर टाकले. मात्र नंतर काही फोटोंमध्ये महिला संघ दिसलाच नाही.

बार्सिलोनाने दोन्ही संघासाठी बिझनेस क्लासचेच तिकीटे काढली होती, असे बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

पुरूष संघ हा अमेरिकेत आतंरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन्स कपमध्ये खेळणार असून त्यांचा रविवारी(29 जुलै) तोटेनहॅम विरुद्ध सामना आहे. तर महिला संघ सॉकर प्रिमियर लीगमध्ये दक्षिण कॅलिफोर्निया विरुद्ध सामना खेळण्यास गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकात पराभूत झाल्यावर नेमार फुटबॉल सोडून खेळतोय हा खेळ

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत  फिनआयक्यु,  सायबेज संघात विजेतेपदासाठी लढत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment