बडोद्याचा क्रिकेटपटू दीपक हुडाला कर्णधार कृणाल पंड्याबरोबर झालेला वाद आणि त्यानंतर सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतून घेतलेली अचानक माघार चांगलीच भोवली आहे. त्याच्यावर बडोदा क्रिकेट असोसिएशनने यंदाच्या संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट हंगामातून निलंबनाची कारवाई केली आहे. हा निर्णय गुरुवारी (२१ जानेवारी) घेण्यात आला.
बडोदा क्रिकेट असोसिएशनमध्ये दीपक हुडावर निलंबनाची कारवाई केली जावी की नाही, याबाबत दोन गट पडले होते. मात्र अखेर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कृणालसह झाला होता वाद
काही दिवसांपूर्वी दीपकने बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्यासह वाद झाल्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून अचानक सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतून माघार घेतली होती. दीपक संघाचा उपकर्णधार होता. त्याने कृणालवर आरोप केले होते, की त्याने त्याला सरावादरम्यान शिवागाळ केला. तसेच कारकिर्दीबाबत धमकी दिली आहे.
याबाबत बडोदा क्रिकेट असोसिएशनेचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी सांगितले की ‘अपेक्स कौन्सिलने निर्णय घेतला आहे की चालू देशांतर्गत क्रिकेट मोसमात दीपक बडोद्याचे प्रतिनिधित्व करु शकणार नाही. घटनेबाबात पूर्ण माहिती संघव्यवस्थापनाकडून आणि प्रशिक्षकाकडून घेतल्यानंतर आणि हुडाबरोबर चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
याबरोबरच गायकवाड यांनी सांगितले की जरी हुडा यंदाच्या हंगामात सहभागी होऊ शकला नाही तरी तो २०२१-२२ या पुढील हंगामात सहभागी होऊ शकतो.
पराग पटेल निलंबनाच्या विरोधात
तसेच बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पराग पटेल म्हणाले, ‘हुडाने घटनेबाबत संघव्यवस्थापनेबरोबर कोणतीही चर्चा न करता निघून जाण्याचा घेतलेला निर्णय चूकीचा होता. पण संपूर्ण मोसमासाठी त्याचे निलंबन करणे गरजेचे नव्हते. त्याला फटकारले जाऊ शकत होते, त्यानंतर त्याला खेळू द्यायला हवे होते.’
महत्त्वाच्या बातम्या –
कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू
कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी: ‘या’ आठ संघात रंगणार उपांत्यपूर्व फेरी, पाहा संपूर्ण वेळापत्रक