---Advertisement---

मुश्ताक अली स्पर्धेसाठी बडोद्याच्या संघातून युसूफ पठाणला वगळले, ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे नेतृत्व

On: शुक्रवार, जानेवारी 1, 2021 11:20 PM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी सगळ्याच राज्य संघटनांनी आपले संघ जाहीर केले आहेत. बडोद्याच्या संघाची पण नुकतीच घोषणा करण्यात आली. मात्र विशेष बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच आक्रमक फलंदाज युसूफ पठाणला संघात स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. युसूफ पठाण बडोद्याच्या संघाचा गेले दशकभर अविभाज्य भाग होता, मात्र २०२१ च्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

बडोद्याच्या संघाचे कर्णधारपद अष्टपैलू कृणाल पंड्याकडे सोपविण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी दीपक हुड्डाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मात्र अनुभवी खेळाडू युसूफ पठाणला संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. सहा राज्यांमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. ३८ संघांना या स्पर्धेसाठी सहा गटांमध्ये विभागण्यात आले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या कोरोनाच्या नव्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल.

बडोद्याने २०१३-२०१४ या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. त्यांनतर मागील ६ वर्षांत एकदाच बडोद्याला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे यावेळी कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा आणखी एक विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल.

बडोद्याचा संपूर्ण संघ- 

कृणाल पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा (उपकर्णधार), भार्गव भट्ट, केदार देवधर, प्रतीक घोदाद्र, कार्तिक काकड़े, लुकमान मेरीवाला, मोहित मोंगिया, ध्रुव पटेल, बाबाशफी पठान, प्रताप प्रसाद, अभिमन्यु सिंह राजपूत, निनाद राठवा, अतित शेठ, विष्णु सोलंकी, सोयब सोपरिया.

महत्वाच्या बातम्या:

खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी

युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले हे उत्तर

भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---