---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफीसाठी बडोदा संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 11:02 PM
---Advertisement---

कोरोनानंतर भारतात स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली आहे. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या यशस्वी आयोजनानंतर आगामी 20 फेब्रवारीपासून 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये देशातील 38 संघ सहभागी होणार असून सर्वांच्या नजरा बडोदा संघावर आहे. नुकतीच बडोदाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

22 सदस्यीय संघाचे कर्णधारपद अनुभवी अष्टपैलू कृणाल पांड्याकडे देण्यात आले आहे. तसेच केदार देवधरला संघाचा उपकर्णधार घोषित केले आहे. बडोदाने सय्यद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफी मध्ये देखील त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पूर्वी कर्णधार कृणाल पांड्या व दीपक हुड्डा मध्ये वाद झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, बडोदा संघाचे बडोदा येथीलच रिलायन्स ग्राउंड वर अभ्यास सत्र सुरू होते. याच दरम्यान पांड्या व हुड्डा यांच्या दरम्यान कोणत्यातरी बाबीमुळे मतभेद झाले. पांड्याने हुड्डा विरुद्ध अपशब्द वापरून करियर संपवण्याची धमकी दिली असल्याचे हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्रात लिहले होते. दरम्यान हुड्डाचा विजय हजारे ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

असा आहे बडोदाचा संघ –

कृणाल पांड्या (कर्णधार), केदार देवधर (उपकर्णधार), प्रत्युष कुमार, विष्णु सोलंकी, अभिमन्यु राजपूत, स्मिथ पटेल (यष्टीरक्षक), निनाद राथवा, अतीत शेठ, कार्तिक काकड़े, ल्यूकमैन मेरिवाला, बाबा सफी पठान, ध्रुव पटेल, भार्गव भट्ट, भानु पनिया, चिंतल गांधी, पार्थ कोहली, ज्योत्सनिल सिंह, मितेश पटेल (यष्टीरक्षक), सोएब सोपारियास, शिवालिक शर्मा, प्रदीप यादव आणि प्रतीक गोदादरा

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी

अरेरे! चेतेश्वर पुजारा झाला दुर्दैवी पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ

अबुधाबी टी१० लीग : दिल्ली बुल्सवर मात करत नॉदर्न वॉरियर्सने पटकावले विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---