आयसीसीने आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)ऑस्ट्रेलियात आयोजित केला. 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. यजमान आणि गतविजेता संघ ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आपले आव्हान टीकून ठेवण्यासाठी सोमवारी (31 ऑक्टोबर) आयर्लंडशी भिडला. ऑस्ट्रेलिया हा सामना कसाही करून जिंकायचाच होता आणि तसे झालेही. ते काहीही असो आयर्लंडच्या एका खेळाडूने मात्र त्याच्या भन्नाट फिल्डींगने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. त्याचा अफलातून क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, तर खुद्द आयसीसीनेही त्याची दखल घेतली आहे.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बॅरी मॅककार्थी (Barry McCarthy) याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत डेविड वॉर्नर याला तीन धावांवरच तंबूत पाठवले. हे काय कमी मॅककार्थीने क्षेत्ररक्षणातही कमाल केली.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना मार्क एडेयर (Mark Adair) हा 15वे षटक टाकत होता. या षटकात त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिस याने उत्तम शॉट खेळला. तो चेंडू सीमारेषेपार जाऊन खेळाडूला षटकार मिळणारच होता, तेवढ्यात मॅककार्थीने हवेत सूर मारत चेंडू अडवला. त्याला माहित होते आपण सीमारेषेवर पडणार म्हणून त्याने चेंडू हाताने आत ढकलला आणि फलंदाजाला केवळ दोनच धावा मिळाल्या. त्याच्या या उल्लेखनीय क्षेत्ररक्षणाचे विरोधी संघाचा विकेटकीपर मॅथ्यू वेड यानेही टाळ्या वाजवत कौतुक केले.
https://www.instagram.com/reel/CkX4cCDp3_T/?utm_source=ig_web_copy_link
मॅककार्थीने या सामन्यात 4 षटके टाकताना 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने वॉर्नरबरोबर ऍरॉन फिंच (63) आणि मिशेल मार्श (28) यांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त जोश लिटिल याने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 21 धावा देत ग्लेन मॅक्सवेल (13) आणि स्टॉइनिस (35) यांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 179 धावसंख्या उभारली.
आयर्लंडचा संघ पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडकडून लोर्कन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 48 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या, मात्र हा सामना ऑस्ट्रेलियाने 42 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय
भारत-पाकिस्तानसह हा देश खेळणार तिरंगी मालिका; नियोजनही झाले सुरु