---Advertisement---

दुखापतग्रस्त असूनही RCBसाठी सलग सामने खेळतोय ‘हा’ पठ्ठ्या, 186च्या स्ट्राईक रेटने चोपल्यात 300+ धावा

RCB
---Advertisement---

मंगळवारी (दि. 1 मे) मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल 2023चा 54वा सामना पार पडला. या सामन्यात एका खेळाडूने स्वत:विषयी धक्कादायक खुलासा केला आहे. तो खेळाडू आरसीबी संघाचा आहे. त्याने म्हटले आहे की, “मी अजूनही बरा होत आहे.” खरं तर, हा खेळाडू रिहॅबला जाऊनही सातत्याने आपल्या संघासाठी आयपीएलमध्ये खेळत आहे. तसेच, संघासाठी विजयी खेळीही साकारत आहे.

‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळत असलेला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) तो खेळाडू आहे. मॅक्सवेलने मोठा खुलासा केला. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी म्हटले की, “आरसीबी संघासाठी मागील तीन हंगामात खेळून आनंद लुटत आहे. या संघाचा भाग होणे एक मजेशीर बाब आहे.” स्वत:विषयी बोलताना तो म्हणाला की, “अजूनही माझे रिहॅब सुरू आहे आणि पुढील दोन महिन्यांपर्यंत चालू राहील. अजूनही पूर्ण फिट राहण्यास बराच वेळ लागेल.”

आयपीएलपूर्वी झालेला दुखापतग्रस्त
विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2022मध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला ही दुखापत मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये झाली होती. यानंतर तो जवळपास 6 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. हंगामातील आपला पहिला सामना खेळण्यापूर्वी आरसीबीने सोशल मीडिया पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत मॅक्सवेलने सांगितले होते की, “पाय ठीक आहे. मला 100 टक्के ठीक होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. आशा आहे की, पाय स्पर्धेसाठी चांगला असेल आणि मी पण माझे काम करेल.”

आरसीबीसाठी अनेक दमदार खेळ्या
आतापर्यंत आयपीएल 2023 स्पर्धेत मॅक्सवेलने अनेक मोठ्या विजयी खेळ्या साकारल्या आहेत. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 186.44च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 33 इतका राहिला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही त्याने सर्वाधिक 33 चेंडूत सर्वाधिक 68 धावा चोपल्या. हे त्याचे या हंगामातील चौथे अर्धशतक आहे. त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 77 धावा आहे. (batsman glenn maxwell big statement on his fitness before the match happened between mi vs rcb ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! मॅक्सवेलने मारला विचित्र शॉट, चेंडू डायरेक्ट बाऊंड्रीच्या पलीकडे; तुम्हीही कधीच पाहिला नसेल
नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---