आपण नेहमीच क्रिकेटमध्ये काही-ना-काही नवीन विक्रम किंवा नवीन किस्से होताना पाहत असतो. एवढेच काय तर, लहानपणी सुद्धा आपण जेव्हा आपल्या आजूबाजूच्या मैदानात किंवा गल्लीत क्रिकेट खेळत असतो. तेव्हाही अनेक मजेशीर किस्से घडताना दिसतात. अगदी एखाद्या गड्याने फटकावलेला चेंडू कधी कोणाच्या तरी घरी जातो आणि त्यानंतर जो गदारोळ होतो, तो पाहण्यासारखा असतो. असाच एक तुमच्या आमच्यातला लहानपणीचा हा किस्सा घडला आहे, इंग्लंडच्या व्यावसयिक क्रिकेट सामन्यात. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होतो आहे.
सध्या इंग्लंडमध्ये व्हिटेलिटी टी-२० ब्लास्ट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत इंग्लंडचे आणि जगातले बाकीचे खेळाडू सुद्धा सहभागी झाले आहेत. या टी-२० स्पर्धेमधील केंट स्पिटफायर्स आणि एसेक्स ईगल्स यांचा सामन्यात केंटबेरी स्पिटफायर मैदानावर झाला. दरम्यान हा मजेशीर किस्सा पाहण्यास मिळाला.
झाले असे की, सामन्याचे एकोणविसावे षटक चालू होते आणि फलंदाज जैक लीनिंग अतिशय आक्रमक अंदाजात फटकेबाजी करत होता. न्यूझीलंडचा गोलंदाज जिमी निशम गोलंदाजी करत असताना त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लीनिंगने ऑफ स्टंपवर आलेला फुल टॉस चेंडू सरळ हवेत फिरकावून मारला. हा षटकार इतका सुंदर होता की, चेंडू सरळ मैदानाजवळ असलेल्या घरात गेला. यावेळी त्या वृद्ध घरमालकाने थोडासा संताप दाखवला. पण कसाबसा चेंडू परत दिला.
परंतु, तो फेकलेला चेंडू मैदानापर्यंत पोहोचू शकला नाही. पुन्हा तो चेंडू मैदानात आणण्यासाठी खूप वेळ गेला. मात्र सामना प्रेक्षकांनी या प्रसंगाचा भरपूर आनंद घेतला.
"Excuse me, can we have our ball back please?" 😂#Blast21 https://t.co/YlrUmoqCct pic.twitter.com/OeGqtIzsRI
— Vitality Blast (@VitalityBlast) June 20, 2021
या सामन्यामध्ये केंट स्पिटफायर्सने पहिली फलंदाजी करतना आक्रमक खेळी केली. सलामीवीर जैक क्रॉलीने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६९ धावा कुटल्या. तसेच डेनियल बेलने ६ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने ४४ चेंडूत ८८ धावा ठोकल्या. यामुळे केट स्पिटफायर्सने २३६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात इसेक्स इगल्स संघ १६९ धावांवरच गारद झाला आणि केट स्पिटफायर्सने ६७ धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-