चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 हंगामात पराभवानंतर सलग विजय मिळवताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद संघाला एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने 7 विकेट्सने धूळ चारली. या विजयात रवींद्र जडेजा आणि डेवॉन कॉनवे यांचा मोलाचा वाटा होता. दुसरीकडे, क्षेत्ररक्षणात धोनीनेही कमाल करून दाखवली. 41 वर्षांच्या वयातही धोनीने चपळता दाखवत चाहत्यांची मने जिंकली.
धोनीने वॉशिंग्टन सुंदरला केले धावबाद
एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावात धोनीच्या चपळाईचे दर्शन घडले. आधी धोनीने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टाकत असलेल्या 14व्या षटकात मयंक अगरवाल याला यष्टीचीत केले. त्यानंतर डावाच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला शानदार पद्धतीने धावबाद केले आणि तंबूचा रस्ता दाखवला.
Aiden Markram ✅
Mayank Agarwal ✅Maheesh Theekshana & @imjadeja with the breakthroughs and @msdhoni with his magic 😉
Follow the match ▶️ https://t.co/0NT6FhLcqA#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/8YqdnUE3ha
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
चेन्नईसाठी शेवटचे षटक मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) टाकत होता. शेवटच्या चेंडूवर पथिरानाने मार्को यान्सेन याला लेग स्टंपवर संथ गतीने चेंडू टाकला. यावेळी त्याने चेंडू लाँग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क झाला नाही. अशात यान्सेन धाव घेण्यासाठी धावू लागताच धोनीने चेंडू पकडला आणि चित्त्याच्या वेगाने स्टंपवर मारला. अशाप्रकारे सुंदरला धावबाद होऊन तंबूचा रस्ता पकडावा लागला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
WHAT A THROW BY DHONI 🔥pic.twitter.com/UPEog772xz
— Johns. (@CricCrazyJohns) April 21, 2023
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मैदानात उतरलेल्या हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 134 धावांच्या आव्हानाचा छोटा डोंगर उभारला होता. हे आव्हान चेन्नईने 18.4 षटकातच गाठले. यावेळी चेन्नईला 3 विकेट्स गमावत 138 धावा करण्यात यश आले. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावा केल्या. तसेच, ऋतुराज गायकवाड यानेही 35 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी हैदराबादविरुद्ध गोलंदाजी करताना जडेजाने 22 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. यामध्ये त्याने अभिषेक शर्मा, मयंक अगरवाल आणि राहुल त्रिपाठी यांची विकेट घेतली. जडेजाव्यतिरिक्त आकाश सिंग, मथीशा पथिराना आणि महीश थीक्षणा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (batsman went to dodge ms dhoni had to go after being run out against sunrisers hyderabad see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जा कोचकडून शिकून ये, इथे वेगाला कुणी घाबरत नाही’, चालू सामन्यात भारतीय दिग्गजाचा उमरानला सल्ला
हाताची घडी, कान उघडे! सामन्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी धोनीकडून घेतले क्रिकेटचे धडे, कोचही सामील