सन 2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) भारतातील क्रिकेटचा चेहरा पूर्णपणे बदलला. आतापर्यंत जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणार्या या लीगचे एकूण 13 हंगाम खेळले गेले आहेत आणि 14 व्या हंगामाला कोरोनामुळे तुर्तास स्थगित आले होते. परंतु लवकरच आयपीएल 2021 चा राहिलेला हंगाम खेळवला जाणार आहे.
आयपीएलमध्ये जगातील अनेक दिग्गज फलंदाजांकडून उत्तम आणि स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडले आहे. आज या लेखात आपण आयपीएलच्या इतिहासातील अशा फलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये कमीतकमी 2 षटकार मारून सर्वाधिक डाव खेळले आहेत.
1. ख्रिस गेल – 69 डाव
किंग्स्टनचा 41 वर्षीय ज्येष्ठ कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलने 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रात आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर गेलने आपल्या 13 वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत 140 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये या फलंदाजाने 40.24 च्या फलंदाजीच्या सरासरीने 4950 धावा केल्या आहेत.
2. रोहित शर्मा – 59 डाव
नागपूरचा खेळाडू व भारताच्या वनडे-टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा पहिल्या सत्रापासून आयपीएल खेळत आहे. त्याने आतापर्यंत 207 सामने खेळले आहेत. या सगळ्या सामन्यात त्याने 31.49 च्या सरासरीने 5480 धावा केल्या आहेत. यात त्याचे एक शतक आणि 40 अर्धशतके यांचा समावेश आहे. रोहितने आतापर्यंत कमीत कमीत 2 षटकार मारताना 59 डाव खेळले आहे. त्यामुळे या यादीमध्ये त्याचे नाव ख्रिस गेलनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
3. विराट कोहली – 54 डाव
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळत आहे. 33 वर्षीय दिल्लीचा फलंदाज आणि भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार असलेल्या कोहलीने आतापर्यंत या लीगमध्ये 199 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये कर्णधार कोहलीने 37.98 च्या फलंदाजीच्या सरासरीने 6076 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 40 अर्धशतके झळकावली आहेत.
प्रत्येक डावात 2 षटकार ठोकत सर्वाधिक डाव खेळण्याच्या बाबतीत विराट मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने असे एकूण 54 डाव खेळले आहेत.
4. महेंद्रसिंग धोनी – 53 डाव
39 वर्षीय माजी कर्णधार आणि रांचीचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर मात्र तो आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने एकूण २११ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करताना माहीने 40.25 च्या फलंदाजीच्या सरासरीने 4669 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 23 अर्धशतकेही केली आहेत.
त्याशिवाय 3 वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या या कर्णधाराने एकूण 53 डावांमध्ये त्याच्या फलंदाजीदरम्यान किमान 2 षटकार ठोकले आहेत.
5. एबी डिव्हिलियर्स – 52 डाव
दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय महान यष्टीरक्षक फलंदाज एबी डिव्हिलियर्ससुद्धा 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रापासून आयपीएलचा भाग आहे. त्यानंतर डिव्हिलियर्सने 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत 176 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 40.77 च्या फलंदाजी सरासरीने 5056 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 3 शतके आणि 40 अर्धशतके आहेत.
उल्लेखनीय आहे की, डिव्हिलियर्सने यावर्षी आयपीएल 2021 मध्ये 5000 आयपीएल धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार या लीगमध्ये 52 असे डाव खेळला आहे, ज्यामध्ये त्याने कमीतकमी 2 षटकार लगावले आहेत.
6. सुरेश रैना- 52 डाव
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा मुरादनगर येथील 34 वर्षीय माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना 2008 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रापासूनच आयपीएलचा भाग होता. रैनाने 13 वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत 200 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 33.08 च्या फलंदाजीच्या सरासरीने 5491 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय डावात कमीतकमी 2 षटकारांच्या विक्रमाबद्दल बोलताना रैनाने असे 52 डाव खेळले आहेत.
7. डेविड वॉर्नर-20 डाव
ऑस्ट्रेलियाचा 34 वर्षीय फलंदाज डेविड वॉर्नर 2008 ची आयपीएल वगळता प्रत्येक हंगामात या लीगचा भाग आहे. मात्र दरम्यानच्या काळात क्रिकेटमध्ये त्याच्यावर आलेल्या बंदीमुळे त्याला एका हंगामासाठी बाहेर बसावे लागले होते. आतापर्यंत वॉर्नरने आयपीएलमध्ये एकूण 148 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 42.22 च्या प्रभावी सरासरीने 5447 धावा केल्या आहेत. या फलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 शतके आणि 50 अर्धशतके ठोकली आहेत. एका डावामधील 2 षटकारांच्या विक्रमाकडे जर नजर टाकली तर वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीत असे 50 डाव खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कॅप्टनकूल’ धोनीच्या तालमीत तयार झालेत ‘हे’ वस्ताद, आज आहेत विविध संघांचे प्रशिक्षक
कर्णधार विलियम्सनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू SRHच्या नेतृत्त्वपदाचे आहेत प्रबळ दावेदार
प्रत्येक आंतरराष्ट्रीय शतक षटकार मारुनच पूर्ण केलेले खेळाडू, दोन्ही आहेत भारतीय