---Advertisement---

मेड इन इंडिया! आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटरबरोबर घडला गमतीशीर योगायोग

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 8:58 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा १३वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला.

या सामन्यात किंग्ज ११ पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला. मुंबईकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला खणखणीत चौकार मारत एक खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू झाला.

यापुर्वी सुरेश रैनाने २३ मार्च २०१९ रोजी ५ हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर विराट कोहलीने २८ मार्च २०१९ रोजी हा कारनामा केला होता. रोहितने १९२ आयपीएल सामन्यात ३१.७२च्या सरासरीने ५०१३ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी असून त्याने १८० सामन्यात ५४३० तर सुरेश रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा केल्या आहेत.

५ हजार धावा करायला समोर हवेत भारतीय गोलंदाज
२०१९मध्ये जेव्हा सुरेश रैना आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला होता तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा उमेश यादव हा भारतीय गोलंदाज रैनाला गोलंदाजी करत होता. त्यानंतर त्यात हंगामात जेव्हा विराटने ५ हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा भारतीय गोलंदाज समोरुन गोलंदाजी करत होता. आता रोहितने पंजाबविरुद्ध ५ हजार धावांचा टप्पा पार केला, तेव्हा मोहम्मद शमी हा भारतीय गोलंदाजच समोरुन गोलंदाजी करत होता. हे तिघेही भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे व आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करणारे सर्वच फलंदाज हे भारतीय आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---