दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात सोमवारी (07ऑक्टोबर) वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्याशी संबंधित एक अनोखा सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी आफ्रिकन क्रिकेटपटू आणि सध्याचे संघाचे मार्यादित फाॅरमॅटचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनी आयर्लंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला. ड्युमिनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 9,000 हून अधिक धावा आणि 130 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.
नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. कदाचित त्यामुळे ड्युमिनीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यावे लागले. टेंबा बावुमा कोपरच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. दुसरीकडे, विआन मुल्डर वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला होता. त्याच्याशिवाय संघाचा सलामीवीर टोनी डी जोर्जी हा देखील सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यानंतर टोनी मैदानात दिसलेला नाही.
Coach JP Duminy fielding for South Africa pic.twitter.com/DTppCnT2Cz
— cricket station (@ShayanR84472894) October 7, 2024
आयर्लंडच्या डावाच्या शेवटच्या षटकात जेपी ड्युमिनीने स्पायडरमॅनप्रमाणे उडी मारत चेंडू रोखला. त्याच्या फिल्डिंगच्या व्हिडिओ क्लिपचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. गेल्याच वर्षी ड्युमिनीची दक्षिण आफ्रिकेच्या पांढऱ्या चेंडूच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सध्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर आफ्रिकन संघाने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे 139 धावा आणि 174 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. जेपी ड्युमिनीने सप्टेंबर 2017 मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. सुमारे तीन वर्षांनंतर, त्याने एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने सुमारे 16 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.
हेही वाचा-
मयंक यादव vs उमरान मलिक; स्पीड, वय, ताकद-कमकुवतता; पाहा कोण भारी?
हा भारतीय क्रिकेटपटू होणार पिता, सोशल मीडियावर शेअर केली खुशखबर
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! टीम इंडिया एकाच वेळी दोन सामने खेळणार