---Advertisement---

भारताचे पहिले चारही फलंदाज चमकले! विराट-राहुलच्या शतकामुळे संघाची धावसंख्या साडेतीनशे पार

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 6:55 PM
Virat Kohli KL Rahul
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी (10 सप्टेंबर) अपूर्ण राहिलेला सामना सोमवारी (11 सप्टेंबर) पुन्हा खेळला जात आहे. भारतीय या सामन्या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 50 षटकांमध्ये भारतीय संघाने 2 विकेट्सच्या नुकसानावर 356 धावा केल्या. यामध्ये भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांचे योगदान महत्वाचे राहिले. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दोघांनी शतकी योगदान दिले.

भारतीय संघासाठी या सामन्यात चार फलंदाज खेळण्यासाठी खेळपट्टीवर आले. विशेष म्हणजे या चौघांनीही किमान अर्धशतकी योगदान दिले. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यानी अनुक्रमे 56 आणि 58 धावांची खेळी केली. रोहित आणि गिलने पुन्हा रविवारी सामना थांबण्यापूर्वीच विकेट गमावली होती. पण राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी वैयक्तिक शतके ठोकत भारताची धावसंख्या उंचावली. विराटने 94 चेंडूत 122*, तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111* धावा कुटल्या. या चौघांच्या योगदानामुळे भारताला 356 धावांपर्यंत मजल मारता आली.

https://twitter.com/BCCI/status/1701224185169875300?s=20

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
वेगवान विराट! वनडे इतिहासात सर्वात जलद मिळवली 13 हजारी मनसबदारी
‘कमाल’ राहुलचे ‘लाजवाब’ कमबॅक! पाकिस्तानी गोलंदाजीची हवा काढत ठोकले तुफानी शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---