बिग बॅश लीग 2020 मध्ये 13 व्या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने ब्रिस्बेन हिट संघाला 2 धावांनी पराभूत केले. या सामन्यात जिमी पीरसने धमाकेदार खेळीने सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर ब्रिस्बेन हिटच्या मुजीब उर रहमानने आपल्या गोलंदाजीने नाही, तर फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले.
या सामन्यादरम्यान मुजीब उर रहमानने आपला देशवासी असलेल्या राशीद खान विरुद्ध आक्रमक फलंदाजी करताना धमाल केली.
मुजीब उर रहमानने ऍडलेड स्ट्रायकर्सकडून खेळत असलेल्या राशीद खानच्या 4 चेंडूत 15 धावा वसूल केल्या. त्याने 10 चेंडूत 18 धावांची खेळी केली. रहमानने आपल्या या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
मुजीबने ब्रिस्बेनच्या डावातील 15 व्या षटकात गोलंदाजी करत असलेल्या राशीद खानची धुलाई करताना 4 चेंडूत 15 धावा केल्या. आपल्या या छोट्याशा खेळीत मुजीबने राशीद खान विरुद्ध रिवर्स स्वीप शॉट खेळून माजी दिग्गज आणि सध्याच्या खेळाडूंना चकित केले.
मुजीब उर रहमानचे रिवर्स स्वीप शॉट पाहून मॅक्सवेलने रिअॅक्शन देत ट्विट करताना लिहिले, “मी मागील आयपीएल स्पर्धेत असे करू शकलो नव्हतो. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, मी मुजीबला रिवर्स स्वीप शॉट खेळायला शिकवले होते.”
I didn’t do much this last IPL, but I’m pretty sure I taught Mujeeb how to play that reverse sweep 😎 #yourewelcomeheat
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) December 23, 2020
सोशल मीडियावर मुजीब रहमानच्या रिवर्स स्वीप शॉटचे खुप कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर बिग बॅश लीगच्या ट्विटर अकाऊंटवर सुद्धा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला, जो की खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात फॅन्स प्रतिक्रीया देत आहेत.
Mujeeb sees the No.1 bowler in the world (and 🇦🇫 teammate) and says have a look at this!! #BBL10 pic.twitter.com/RCuN6CZdwb
— KFC Big Bash League (@BBL) December 23, 2020
And then he goes 6️⃣, 4️⃣ to finish the over. WHAAAAT! #BBL10 https://t.co/JLD0txzywP
— KFC Big Bash League (@BBL) December 23, 2020
रहमान-पीरसनची विक्रमी भागीदारी
मुजीब उर रहमान आणि जिमी पीरसन या दोघांनी 9 विकेटसाठी 60 धावांची भागीदार केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देवू शकले नाहीत. ही भागीदारी बिग बॅश लीगमध्ये 9 व्या विकेटसाठी साकारलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.
या सामनयात ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या होत्या आणि ब्रिस्बेन संघाला विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र ब्रिस्बेन संघाला 151 धावांचा पाठलाग करताना जिमी पीरसनच्या नाबाद 69 धावांच्या खेळीच्या जोरावर 9 विकेट्स गमावून 148 धावाच करता आल्या. त्यामुळे ब्रिस्बेन संघाचा दोन धावांनी पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
‘लाल चेंडूने भारताला होईल फायदा’, माजी खेळाडूचे वक्तव्य
‘हा’ धुरंधर खेळाडू बनला तामिळनाडूचा कर्णधार; टी२० स्पर्धेत करणार नेतृत्त्व