Glenn Maxwell Six On The Roof: ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित टी20 स्पर्धा बिग बॅश लीग 2023-24 मध्ये एकापेक्षा एक फलंदाज आपल्या फटकेबाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. यामध्ये मेलबर्न स्टार्स संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याचाही समावेश आहे. मॅक्सवेलच्या संघाने मोइसेस हेनरिक्स याच्या नेतृत्वातील सिडनी सिक्सर्स संघाचा 4 विकेट्सने पराभव केला. असे असले, तरीही या सामन्यादरम्यान मॅक्सवेलने मारलेल्या षटकाराने मैफील लुटली. त्याचा षटकार थेट छतावर जाऊन पुन्हा खाली आला. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांच्या भुवया उंचावत आहे.
या सामन्यात मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 154 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्टार्सने 19.3 षटकातच 6 विकेट्स गमावत 155 धावा केल्या आणि सामना खिशात घातला.
मॅक्सवेलचा गगनचुंबी षटकार
या सामन्यात मेलबर्नकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने फक्त 8 चेंडूंचा सामना करताना 12 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. त्याने मारलेला षटकार इतका जबरदस्त होता की, त्यामुळे चाहत्यांना आपल्या खुर्चीवरून उठण्यासाठी भाग पाडले. मॅक्सवेलने हा षटकार सातवे षटक टाकत असलेल्या जॅक्सन बर्ड याच्या पाचव्या चेंडूवर मारला. हा षटकार 92 मीटर लांबीचा होता. यावेळी बॅट आणि चेंडूचे कनेक्शन इतके चांगले होते की, चेंडू स्टेडिअमच्या छतावर जाऊन पुन्हा खाली पडला. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे.
OH MY. GLENN MAXWELL 🔥#BBL13 pic.twitter.com/h1Em09XFFA
— Melbourne Stars (@StarsBBL) December 26, 2023
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना सिक्सर्ससाठी जेम्स विन्सने 83 धावांची शानदार खेळी साकारली. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे संघाची धावसंख्या जिथे 170-180 पर्यंत जाणार होती, ती फक्त 154 धावांवरच थांबली. स्टार्ससाठी गोलंदाजी करताना हॅरिस रौफ आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सची सुरुवात निराशाजनक राहिली. 66 धावसंख्या गाठण्यापर्यंत स्टार्सने मॅक्सवेलसह 4 विकेट्स गमावल्या. मात्र, यानंतर ब्यू वेबस्टर आणि हिल्टन कार्टराईट यांच्यात झालेल्या अर्धशतकीय भागीदारीच्या जोरावर मेलबर्नने 4 विकेट्स राखत संघाला आव्हान गाठून दिले. (bbl 2023 melbourne stars captain glenn maxwell huge six ball lands on the roof see video here)
हेही वाचा-
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी रबाडाने घडवला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला आफ्रिकेचा फक्त 7वा गोलंदाज
केएलचा क्लास पाहून भलतेच खुश झाले इरफान पठाण अन् गावसकर; म्हणाले, ‘या 70 धावा शतकापेक्षाही…’