पर्थ स्क्रॉचर्स संघाने बिग बॅश लीगची (Big Bash League) चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. बिग बॅश लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. यामध्ये पर्थ स्क्रॉचर्सने सिडनी सिक्सर्सला ७९ धावांनी पराभूत केले आणि जेतेपद पटकावले. स्क्रॉचर्ससाठी हा विजय सोपा ठरला. सिक्सर्स संघ सामन्याच्या सुरुवातीपासून मागे पडला होता. विजयानंतर आनंद साजरा करताला स्क्रॉचर्सच्या एका खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसले, पण तरीही खेळाडू आनंदात मुलाखत देत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंतिम सामना मेलबर्नच्या डॉकलंड्स स्टेडियममध्ये खेळला गेला. सिक्सर्स संघाला विजयासाठी १७२ धावांची आवश्यकता होती. लक्ष्याचा पाठलाग करताना सिक्सर्स संघ १६.२ षटकात अवघ्या ९२ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी पर्थ स्क्रॉचर्स आता बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक वेळा जेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे.
विजयानंतर स्क्रॉचर्स संघाचे खेळाडू खूपच आनंदात दिसले. खेळाडूं एवढ्या आनंदात होते, की यादरम्यान त्यांच्या एका सहकाऱ्याच्या नाकाला जोरात धक्का लागला आणि नाकातून रक्तही आले. या खेळाडूचे नाव होते झाय रिचर्ड्सन (Jhye Richardson).
विजयाच्या आनंदात रिचर्ड्सनच्या नाकाला संघातील एका सहकाऱ्याचा खांदा लागला. परंतु त्याचा परिणार रिचर्ड्सनच्या आनंदात मात्र पडला नाही. त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते, तरीही तो मुलाखत देताना हासत होता. यासाठी चाहत्यांकडून रिचर्ड्सनचे कौतुक केले जात आहे.
नाकातून आणि तोंडातून रक्त येत असतानाही मुलाखतीत रिचर्ड्सन म्हणाला की, “जिंकणे नेहमीच रोमांचक असते. दुखापतीचे बोलायचे तर, कोणाचातरी खांदा लागला आहे.” त्याच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आनेंकांनी त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. रिचर्ड्सनने या अंतिम सामन्यात ३.२ च्या सरासरीने २० धावा खर्च केल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
When celebrations go wrong, featuring Jhye Richardson 😂 pic.twitter.com/xAkvP59fqy
— 7Cricket (@7Cricket) January 28, 2022
सामन्याचा विचार केला, तर पर्थ स्क्रॉचर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते. प्रथम फलंदाजी करताना स्क्रॉचर्सने सहा विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सने खूपच निराशाजनक खेळी केली. सिक्सर्सच्या संघाचे फलंदाज लक्ष्या पाठलाग करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. डेनियल ह्यूजने ५५ धावां केल्या, पण दुसऱ्या बाजून त्याला कोणताच फलंदाज साथ देऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
फलंदाजीत फेल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने सुरू केली शेती!! ‘त्या’ फोटोवरून चाहत्यांनी घेतली मजा
बल्ले..बल्ले..! भाऊ युसूफने ब्रेट लीला मारला ९५ मीटरचा षटकार, आनंदाने इरफानचा मैदानातच भांगडा
व्हिडिओ पाहा –