---Advertisement---

रवी शास्त्रींचा द्रविडला मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘जर भविष्याचा विचार करत असाल, तर…’

On: शनिवार, जानेवारी 29, 2022 8:23 AM
Ravi-Shastri-and-Rahul-Dravid
---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत दारुण पराभव केल्यानंतर भारतीय संघाला (Team India) फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील मालिका खेळायची आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळली जाईल. तत्पूर्वी, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

शास्त्रींच्या मते द्रविडने संघातील युवा खेळाडूंवर अधिक लक्ष दिले पाहिजे, कारण ते पुढच्या ४-५ वर्षांपर्यंत संघासोबत खेळू शकतात. 

पाकिस्तान संघाच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबत शास्त्री त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होते. त्यावेळी शास्त्री म्हणाले की, “पुढचे ८-१० महिने भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्वाचे आहेत. या काळात सर्व खेळाडूंना ओळखणे गरजेचे असेल, जे तुम्हाला ४-५ वर्ष पुढे घेऊन जातील. मला नेहमी वाटते की, संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असायला पाहिजे.”

“जर तुम्ही भविष्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कधी-कधी बदल देखील करावे लागतील. हीच वेळ आहे, पुढच्या सहा महिन्यांमध्ये युवा खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. घाई करण्याची आवश्यकता नाहीय. जर तुम्ही खूप जास्त काळासाठी त्याच खेळाडूंसोबत राहिलात, तर संघात ताळमेळ बसणे अवघड होईल.” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.

अधिक वाचा – ‘द्रविडला एक महान संघ मिळाला आहे’, रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, मागच्या काही महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये आधीच खूप बदल पाहायला मिळाले आहेत. विराट कोहलीने तिन्ही स्वरूपांमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आहे. रोहित शर्मा आता टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. अशात संघासमोर दोन महत्वाच्या आयसीसी स्पर्धा आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टी२० विश्वचषक आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहेत. या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावरही असणार आहे. अशात शास्त्रींनी दिलेला सल्ला द्रविडच्या कामी येऊ शकतो.

व्हिडिओ पाहा – द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण 

वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेची सुरुवात ६ फ्रेबुवारीला होईल. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाईल. त्यानंतर उभय संघातील टी२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली जाईल. टी२० मालिकेची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून होईल.

महत्वाच्या बातम्या –

फलंदाजीत फेल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने सुरू केली शेती!! ‘त्या’ फोटोवरून चाहत्यांनी घेतली मजा

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर माजी निवडकर्त्याचे तिखट भाष्य, “मालिकांपूर्वीच दुखापत होते, असा कॅप्टन…”

‘भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे’, वेस्ट इंडिजच्या दिग्गज कर्णधाराकडून रोहितवर कौतुकाची थाप

व्हिडिओ पाहा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---