---Advertisement---

बीबीएल फायनल : सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्कॉचर्स विजेतेपदासाठी आमने-सामने, पाहा कधी आणि कुठे होणार सामना

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 11:47 AM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बिग बॅश लीगचा अंतिम टप्पा आला असून अंतिम सामना शनिवारी(६ फेब्रुवारी) सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या सिडनी सिक्सर्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स संघात पार पडेल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.१० ला सुरुवात होणार आहे.

विजेतेपद कायम राखण्याचे सिडनी सिक्सर्ससमोर आव्हान 

गतविजेत्या सिडनी संघाने यंदा देखील अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे ते विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करतील. सिडनीने या हंगामात साखळी फेरीमध्ये १४ पैकी ९ सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता. तर त्यांना या हंगामात ५ सामन्यात पराभवाचाही समाना करावा लागला आहे. त्यांनी बाद फेरीत प्रवेश केल्यानंतर क्वालिफायर सामन्यात पर्थ स्कॉचर्सलाच पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.

चौथे विजेतेपद जिंकण्यास पर्थ उत्साही 

पर्थ स्कॉचर्स देखील आयपीएलमधील एक यशस्वी संघ आहे. त्यांनी ३ वेळा बीबीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे शनिवारी ते चौथे विजेतेपद जिंकण्यास उत्साही असतील. पर्थने या हंगामात साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर बाद फेरीत क्वालिफायरमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने चॅलेंजर्स सामना खेळावा लागला होता. चॅलेंजर्स सामन्यात त्यांनी ब्रिस्बेन हिटचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

या खेळाडूंवर असेल नजर –

पर्थ स्कॉचर्स संघातील झाय रिचर्डसनने या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच अँड्र्यू टायकडूनही पर्थला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्यानेही या हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे. फलंदाजीत कॉलिन मुनरो, जेपी इंग्लिश, लिविंगस्टोन या फलंदाजांकडून मोठ्या धावा करण्याची आशा पर्थला असेल.

सिडनी संघातील गोलंदाजांमध्ये बेन द्वारशुस, कर्लोस ब्रेथवेट यांच्याकडे लक्ष असेल. तर फलंदाजांमध्ये जोश फिलिप, जेम्स विन्स यांच्याकडून सिडनीला मोठ्या धावांची अपेक्षा असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

IND vs ENG : जो रूटचं शतक आणि भारताच्या खराब गोलंदाजीबद्दल ट्विटरवर कमेंट्सचा भडिमार 

व्हिडिओ: टिम इंडियाचे कोच रवी शास्त्रींची घसरली जीभ; म्हणाले, “कांगारूंची बॅन्ड वाजवून आलो आहोत”  

सचिन आणि वाद: ‘जेव्हा सचिन म्हणाला होता की, मी क्रिकेटपटू नाही तर अभिनेता आहे’, वाचा ते संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---